उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यासोबत लिफ्टमध्ये अजितदादा गटाचा हा नेताही होता?; काय घडलं?

उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यासोबत लिफ्टमध्ये अजितदादा गटाचा हा नेताही होता?; काय घडलं?

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांची आज विधानभवनात अचानक भेट झाली. विधानभवनाच्या लिफ्ट जवळ दोन्ही नेते भेटले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी लिफ्टमधून प्रवासही केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे आणि फडणवीस यांच्यात यावेळी काय चर्चा झाली? कुणी कुणाला डोळा मारला? लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये संवादाच्या अभावाची कोंडी फुटली का? अशा चर्चा या भेटीनंतर होऊ लागल्या आहेत. तसेच लिफ्टमध्ये हे दोन नेते आणि मिलिंद नार्वेकर असे तिघेच होते, असं सांगितलं जात होतं. पण या लिफ्टमध्ये आणखी नेता असल्याचं समोर आलं आहे. हा नेता अजितदादा गटाचा असल्याचं उघड झालं आहे.

राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी विधानभवनात आले होते. पक्ष कार्यालयात जाण्यासाठी ते लिफ्ट जवळ आले. तिथे योगायोगाने देवेंद्र फडणवीसही आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही तिथे आले. या तिन्ही नेत्यांनी लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. सोबत मिलिंद नार्वेकरही होते. या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही लिफ्टमध्ये एकत्र होतो. आम्ही एकमेकांना जय महाराष्ट्र केला. तेवढ्यात पहिला मजला आला. मी सुद्धा दोघांना जय महाराष्ट्र करून बाहेर पडलो, असं छगन भुजबळ म्हणाले.

कुणाला डोळा मारला ते सांगा?

उद्धव ठाकरे यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लिफ्टच्या बाहेर राहिलेल्यांनी विचार करावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी कुणाला डोळा मारता ते सांगा ? मी डोळा मारला असं वाटतं तर मी उद्यापासून गॉगल लावून येतो, असं मिश्किल विधान त्यांनी केलं.

लॉबीत काय काय घडलं?

उद्धव ठाकरे हे विधानभवनात आल्यानंतर विधानभवनाच्या लॉबीत आले. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी ते लिफ्टजवळ येऊन उभे राहिले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तीन मिनिटांची भेट झाली. लिफ्टची वाट पाहत असताना हे दोन्ही नेते समोरा समोर आले. यावेळी छगन भुजबळही उपस्थित होते. लिफ्ट येईपर्यंत या दोन्ही नेत्यांचा अडीच मिनिटं संवाद झाला. दोघेही नेते लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्विय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, प्रविण दरेकर आणि छगन भुजबळ उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;