Mahavikas Aaghadi : मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत ठिणगी? CM पदासाठी राऊतांनी रेटले उद्धव ठाकरेंचे नाव, काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय?

Mahavikas Aaghadi : मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत ठिणगी? CM पदासाठी राऊतांनी रेटले उद्धव ठाकरेंचे नाव, काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय?

विधानसभेचे मैदान आता महाविकास आघाडी आणि महायुतीला खुणावत आहे. लोकसभेतील दमदार कामगिरीने महाविकास आघाडीला शंभर हत्तीचे बळ आले आहे. विधानसभेत चमकदार कामगिरी करण्यासाठी आणि मतांचा कौल आपल्या पारड्यात टाकण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाचा बिगुल वाजला आहे. महायुती सरकारवर तुटून पडण्याची वेळ आली असतानाच खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन रान पेटवले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करता, महाविकास आघाडीने मतदारांकडे मत मागू नये, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. त्यावरुन महाविकास आघाडीत आता कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर सावध भूमिका घेतली आहे. तर महायुतीने या आयत्या कोलतीवर चिमटे काढले आहेत.

तर निवडणुकीला सामोरे जाणे धोकादायक

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव रेटले आहे. बिन चेहऱ्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मतदान मागणे हे धोक्याचे असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार हा धोका आहे. या महाराष्ट्र आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचे काम पाहिले आहे. लोकसभेला पण त्यांच्या चेहऱ्यामुळे मतदान झाल्याचा दावा राऊतांनी आज केला. त्यानंतर महाविकास आघाडीत आतापासूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून आले.

अगोदर सत्ता तर मिळवू द्या

संजय राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पण त्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पदासाठी आताच महाविकास आघाडीतील कुठल्याही नेत्यांनी स्वारस्य दाखवू नये. आम्ही सत्तेवर पाहिजे हे स्वारस्य असले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. निवडून आलेले आमदार त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतली. त्यावर आताच भाष्य करणे टाळले पाहिजे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

राऊतांच्या दाव्यातील काढली हवा

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. राऊतांच्या विधानावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढणार आहोत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडणुकीनंतर आणि निकालानंतर ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय शिरसाट यांनी काढला चिमटा

संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या विधानावर महायुतीचे नेते संजय शिरसाट यांनी चांगलाच चिमटा काढला. उद्धव ठाकरे यांना राऊतांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. पक्षाचा नेता म्हणून त्यांनी केलेली मागणी हे त्याच्यापूरती सीमित आहे. शरद पवार असतील किंवा इतर काँग्रेसचे नेते असतील हे कधी मान्य करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे राऊत हे काडी लावत असल्याचा टोला त्यांनी हाणला. काँग्रेसचे लोकसभेतील स्ट्राईक रेट चांगला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शरद पवार यांची राष्ट्रवादी असल्याचे शिरसाट म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;