Mansoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या पीचवर कुणाची जोरदार बॅटिंग; सरकारकडून घोषणांचा पाऊस तर विरोधक घामटा काढणार

Mansoon Session : पावसाळी अधिवेशनाच्या पीचवर कुणाची जोरदार बॅटिंग; सरकारकडून घोषणांचा पाऊस तर विरोधक घामटा काढणार

लोकसभा निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरणं बदलण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत. त्यातच आजपासून पावसाळी अधिवेशनाची नांदी सुरु होत आहे. यंदा महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पावसाळी अधिवेशनाच्या पीचवर दोन्ही पक्ष दमदार बॅटिंग करण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी हे विधानसभेसाठी दंडबैठका मारत आहेत. त्याचे पडसाद या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून पाहायला मिळतील.

घोषणांचा पाऊस

आज पासुन पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या घोषणा या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवेशनात निवडणुका डोळ्यांसमोर घोषणांचा पाऊस होऊ शकतो. तर विरोधक अनेक मुद्यावरून आक्रमक होऊ शकतात.

निवडणुका डोळ्यासमोर, कोण घेणार आघाडी

विधानसभा निवडणूक ही आता तोंडावर येऊन ठेपली आहे. नजीकच्या काळात विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी तर विधानसभेची अंदाजित तारीख पण जाहीर केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जय्यत तयारी सुरु केली आहे. विधानसभेसाठी बैठकांची सत्र सुरु आहे. दोन्ही गट जोर बैठका मारत आहे. लोकसभेतील मुसंडीने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर महायुती वचपा काढण्यासाठी रणनीती आखत आहे. त्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनाची पीच अत्यंत फायदेशीर राहील. त्याचा दोन्ही गट पुरेपुर वापर करतील. अनेक मुद्यांवर वातावरण तापेल, तर सरकार बाजू सावरण्यासाठी मोठ्या घोषणा करेल.

पावसाळी अधिवेशनातील विरोधकांचे मुद्दे

– शेतकरी कर्जमाफी
– दुधाला कमी भाव
– नीट परीक्षा रद्द
– बोगस बियाणे
– ज्यादा भावात बियाणे विक्री
– बेरोजगारी
– अटल सेतू भेगा
– शेतकरीला मदत न करने
– शेतकरीला पीक कर्ज न देने
– कायदा सुव्यवस्था
– पोलिस भरती रद्द
– परीक्षा घोळ
– पेपर फुटी
– पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण
महागाई सहीत इतर ही मुद्दे महत्त्वाचे असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;