Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : सोलापूरमध्ये कोणाचं पारडं जड, पाहा Video
सोलापूर लोकसभेतल्या ६ विधानसभांपैकी सोलापूर उत्तर, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, अक्कलकोट या ४ ठिकाणी भाजपचे तर मोहोळमध्ये अजितदादा गटाचे यशवंत माने असे 5 आमदारांचं बळ महायुतीच्या बाजूला होतं. तर मविआच्या बाजूला एकट्या सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार होत्या. अजितदादा गटाचे आमदार यशवंत मानेंच्या मोहोळ विधानसभेतून काँग्रेसला 63 हजार 152 मतांचं लीड मिळालं. भाजप आमदार असलेल्या समाधान आवताडेंच्या पंढरपुरातून 45 हजार 420 चं लीड काँग्रेसला गेलं. भाजप आमदार सुभाष देशमुखांच्या सोलापूर दक्षिणमधूनही काँग्रेसला 9 हजार 436 ची आघाडी मिळाली
भाजपच्या सचिन शेट्टींच्या अक्कलकोटमधून भाजपला 9 हजार 297 चं लीड मिळालं. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार असलेल्या सोलापूर मध्य मध्ये त्यांना अवघं 796 चं मताधिक्य राखता आलं. तर भाजप आमदार विजय देशमुखांच्या सोलापूर उत्तरमधून भाजपला 35 हजार 927 ची आघाडी मिळाली.
निकालावेळी काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना 6 लाख 20 हजार 225 मतं मिळाली. भाजपच्या राम सातपुतेंना 5 लाख 46 हजार 28 मतं. प्रणिती शिंदेंचा 74 लाख 197 मतांनी विजय झाला. 2019 ला सोलापूर लोकसभेत भाजपला 48.68 टक्के मतं मिळाली होती. यंदा 45.33 टक्के मतं मिळाली. गेल्यावेळी काँग्रेसची टक्केवारी 33.98 टक्के होती., यंदा मात्र 51.49 टक्के मतं मिळाली. म्हणजे भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 3.35 टक्क्यांची घट झाली., तर काँग्रेसची मतं तब्बल 17.51 टक्क्यांनी वाढले.
2019 आणि 2024 च्या तुलनेत कुठे कुणाला लीड मिळालं. . 2019 ला मोहोळमध्ये काँग्रेसच्या सुशिलकुमार शिंदेंना 15 हजार 429 लीड होतं. यंदा मोहोळमधून प्रणिती शिंदेंना 63 हजार 152 मतांची आघाडी मिळाली. सोलापूर उत्तरमध्ये गेल्यावेळी भाजपच्या जयसिद्देश्वरांना 63 हजार 667 ची आघाडी होती. यंदा घट होवून राम सातपुते 35 हजार लीड घेवू शकले.
सोलापूर मध्य मध्ये जयसिद्धेश्वरांना 30 हजार 829 चं लीड होतं. यंदा प्रणिती शिंदेंना 796 मतांची आघाडी मिळाली. 2019 ला अक्कलकोटमधून भाजपच्या जयसिद्धेश्वरांना 47 हजार 429 लीड होतं. यंदा राम सातपुतेंना 9 हजार 297 चं मिळालं. सोलापूर दक्षिणमध्ये भाजपला 37 हजार 778 ची आघाडी होती. यंदा इथं प्रणिती शिंदे 9436 मतांनी पुढे राहिल्या. तर गेल्यावेळी पंढरपुरात सुशिलकुमार शिंदेंना 6196 ची आघाडी होती. यंदा प्रणिती शिंदेंनी तब्बल 45 हजार 420 मतांचं लीड घेतलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List