सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप, जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने चौकशीचे आदेश, हायव्होल्टेज घडामोडी

सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप, जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने चौकशीचे आदेश, हायव्होल्टेज घडामोडी

नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ जळगावात झालेल्या बैठकीनंतर कथित पैसे वाटपाच्या प्रकाराची जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी केली जाणार आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जळगावचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना या प्रकरणाची चौकशी करण्याबाबतचं पत्र उपजिल्हाधिकारी यांनी दिलं आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावच्या आदित्य लॉन्स येथे बैठक पार पडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर आदित्य लॉन्स येथे पैसे वाटप होत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पैसे वाटप केल्याच्या प्रकाराबाबतचा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच त्याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे. चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

उमेदवारांकडून साडी वाटप, नथनी तसेच कपडे वाटपाबाबत कुठल्याही शिक्षकाची तक्रार आलेली नाही. पैठणी साडी, महागडे कपडे तसेच नथ वाटप झाल्याबाबत शिक्षकाची तक्रार आल्यास त्यानुसार त्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करणार असल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची असल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे नेमके आदेश काय?

  • आदित्य लॉन्स या ठिकाणी 22 जूनला झालेल्या सभेसाठी परवानगी घेण्यात आली होती का? तसं नसल्यास नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.
  • सदर चित्रीकरणात दिसून येणाऱ्या इसमांची शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांच्यामार्फत ओळख पटवावी.
  • सदर सभेदरम्यान झालेल्या चित्रीकरणाचे फुटेज तात्काळ ताब्यात घेण्यात येऊन आणि सदर चित्रीकरणाची भरारी पथकामार्फत चौकशी करावी.
  • सदर चित्रीकरणात पैसे घेऊन जात असल्याबाबतचे अभिलेख जप्त करण्यात यावे. अभिलेख गहाळ झाल्यास भारतीय पुरावा अधिनियम 1872 अन्वये आवश्यक ती कार्यवाही करावी.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;