Maharashtra Breaking News LIVE : संसदेचे आजपासून अधिवेशन, खासदारांचा शपथविधी होणार
नवीन सरकारचे पहिले अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात पहिले दोन दिवस नवीन खासदारांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिभाषणासाठी धन्यवाद प्रस्ताव मांडून चर्चेला सुरुवात करणार आहेत. नीट घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करणार आहे. पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी दुपारी मंदिर समितीच्या वतीने आमंत्रण दिले जाणार आहे. पुण्यात महविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. आठ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तीन, काँग्रेस तीन तर शिवसेना ठाकरे पक्ष दोन जागा लढणार असल्याचे सांगितले जात आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List