Mumbai Criem : सब-इंस्पेक्टरकडून लग्न झालेल्या कॉन्सटेबलवर अत्याचार, पतीला सोडण्यासाठी आणला दबाव

Mumbai Criem : सब-इंस्पेक्टरकडून लग्न झालेल्या कॉन्सटेबलवर अत्याचार, पतीला सोडण्यासाठी आणला दबाव

मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कायद्याचे रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर खळबळजनक आरोप झाला आहे. हा आरोप त्याच्या विभागातील महिला कॉन्सटेबलने लावला आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याने महिलेकडून 19 लाख रुपये उकळले आहे. महिला कॉन्सटेबलच्या फिर्यादीनंतर मुंबईतील पंत नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस विभागातील महिला असुरक्षित असेल तर काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

काय आहे प्रकरण

मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे. या पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका 32 वर्षीय महिला कॉन्सटेबलसोबत हा प्रकार घडला आहे. एका सहायक पोलीस निरीक्षकाने त्या विवाहित महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवले. तिला नवी मुंबईतील सानपाडा भागात एका फ्लॅटवर नेऊन तब्बल 2 अत्याचार केला.

सन 2020 ते जुलै 2022 दरम्यान हा प्रकार आहे. तसेच त्या महिला कर्मचारीकडून 19 लाख रुपये उकळले. त्यानंतर तिला तिच्या पतीला सोडून देण्याचे सांगितले. पतीला सोडून न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. फसवणूक करुन घेतलेल्या पैशापैकी 14 लाख 61 हजार परत केले.

पोलिसांकडून चौकशी सुरु

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान 376 (बलात्कार), 376 (2) (एन), 354 (ए), 354 (डी), 506 (2) आणि 420 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पंतनगर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने दाखल केला. त्यानंतर तो गुन्हा सानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सानपाडा पोलीस करत आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;