Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : यशोमती ठाकूर यांनी टाळं तोडून मिळवलं कार्यालय, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : यशोमती ठाकूर यांनी टाळं तोडून मिळवलं कार्यालय, पाहा Video

काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडेंना सरकारी कार्यालयाची चावी महिन्याभरात मिळाली नाही. त्यामुळे यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना इशारा देवून तात्काळ टाळं तोडून कार्यालयही ताब्यात घेतलं. थेट टाळं तोडून यशोमती ठाकूरांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडेंना कार्यालय मिळवून दिलं. महिनाभर होवूनही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातल्या खासदारांच्या कार्यालयाची चावी, बळवंत वानखडेंना मिळाली नाही. अखेर यशोमती ठाकूरांनी टाळं तोडलं आणि आपल्या खासदारासाठी कार्यालय खुलं केलं.

विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे आधी चंद्रकांत पाटलांच्या भेटीसाठी आले. आणि कार्यालय मिळत नसल्यानं संताप व्यक्त केला. कार्यालय ताब्यात घेणार हे सांगून, यशोमती ठाकूर आणि वानखडे कार्यालयाच्या दिशेनं आले. पोलिसांचा फौजफाटा लागलाच होता. कार्यालायच्या समोर बॅरिकेटिंगही केलं. मात्र बॅरिकेटिंग हटवून टाळं तोडून यशमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे कार्यालयात शिरले.

पाहा व्हिडीओ:-

आता जिल्हाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडेंना कार्यालयाची चावी का दिली नाही. तर त्याचं कारण आहे, राज्यसभेचे भाजपचे खासदार अनिल बोंडेचाही त्याच कार्यालयाच्या मागणीसाठी आलेला अर्ज. दोन्ही खासदारांना ते कार्यालय मिळावं अशी मागणी यशोमती ठाकुरांची आहे. यशोमती ठाकूर विरुद्ध नवनीत राणा हा संघर्ष अमरावतीत नवा नाही. अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे अशी थेट लढत झाली.

ज्यात वानखडेंनी राणांचा 19 हजार मतांनी पराभव केला. आता बळवंत वानखडेंना कार्यालय मिळवून देण्यासाठीही यशोमती ठाकुरांनीच टाळं तोडलं. स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी अमरावतीस्त फलंदाजांना बाद केले आहे. साउथीच्या नावावर न्यूझीलंडकडून 126 सामन्यात 164 विकेट्स आहेत. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने 90 टी-20 सामन्यात 147 विकेट घेतल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;