जळगावमध्ये पोलिसांवर दगडफेक का झाली, नेमकं काय आहे प्रकरण?

जळगावमध्ये पोलिसांवर दगडफेक का झाली, नेमकं काय आहे प्रकरण?

जळगावच्या जामनेरमधील एका हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. 11 जून रोजी जामनेर तालुक्यात एका 6 वर्षीय चिमुकलीवर 35 वर्षीय नराधामानं अत्याचार करुन तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर 10 दिवस आरोपी हा पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी या नराधमाला अटक केलीय.

6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या करण्यात आली. जळगावच्या जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावातील ही घटना आहे. 6 वर्षाच्या चिमुकलीवर एका 35 वर्षीय नराधमानं अत्याचार करुन तीची हत्या केली. त्यानंतरनराधम पसार झाला. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली. बेपत्ता चिमुकलीचा शोध घेतल्यानंतर गावाजवळील एका केळीच्या शेतात मृतदेह आढळला.चिमुकलीवर अत्याचार करुन तीची हत्या केल्याचं तपासणीत समोर आलं

10 दिवसानंतर पोलिसांनी नराधमला अटक केली. यानंतर गावातील संतप्त जमावानं आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. आरोपीला आम्हीच शिक्षा देणार असल्याचं जमावानं म्हटलं. पोलिसांनी जमावाला समजवल्यानंतरही ते ऐकायला तयार नसल्यानं जमावानं जामनेर पोलीस स्टेशनवरचं दगडफेक केली. जमावानं केलेल्या दगडफेकीत 15 पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीला राजकीय संरक्षण असल्याच्या भावनेतून दगडफेक झाली असेल दावा एकनाथ खडसेंनी केला. मात्र, दगडफेक करणं चुकीचं असल्याचंही यावेळी एकनाथ खडसेंनी म्हटलंय. जळगावातील जामनेरमधील प्रकरणानं जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राही हादरलाय. त्यामुळे आरोपी नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येतेय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;