Amit Thackeray | ‘शर्टलेस सपोर्ट’वर अमित ठाकरे भडकले, पहिल्यांदाच दिले उद्धवकाका यांना जळजळीत उत्तर

Amit Thackeray | ‘शर्टलेस सपोर्ट’वर अमित ठाकरे भडकले, पहिल्यांदाच दिले उद्धवकाका यांना जळजळीत उत्तर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसतसे ठाकरे कुटुंबातील राजकीय वैर अधिक वाढताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिन शर्त पाठींबा दिला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात बोलताना काहींनी शर्टलेस पाठींबा दिला होता अशी टीका केली होती. राज ठाकरे यांच्यावरील या टीकेला त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी जळजळीत उत्तर दिले. काका उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे.

बिनशर्त विरुद्ध बिनशर्ट पाठिंब्यावरुन ठाकरे गट आणि मनसेमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाल्याचे या निमित्ताने दिसून आले. 2019 मध्ये वरळीमध्ये मनसेचाच बिनशर्त पाठींबा घेवून मुलाला आमदार केले. तेव्हा काही वाटलं नाही का?, असा प्रती सवाल अमित ठाकरे यांनी केला. जेव्हा आपल्या मुलाला आमदार बनवायचे होते तेव्हा त्यांना शर्टलेस पाठींबा आवडला होता. आता त्यांना ते अनैतिक का वाटत आहे? आमच्या पाठिंब्यामुळेच तुमचा मुलगा आमदार होऊ शकला हे विसरू नका, असे त्यांनी ठणकावले.

उद्धव ठाकरे यांचा ‘बिनशर्ट पाठिंबा’ हा विनोद समजायला मला पहिली 10 मिनिटे लागली असा टोला लगावून ते पुढे म्हणाले, वरळीतही राज ठाकरे यांनी त्यांना अशीच मदत केली होती. मग आपल्या मुलाला आमदार करताना याचा विचार का केला नाही? यावेळी अमित ठाकरे यांनी चुलत भाऊ आदित्य ठाकरे यांनाही आव्हान दिले. त्यांना आता वरळी विधानसभेचे वास्तव समजेल. निवडणुकीला तीन महिने बाकी आहेत. आता तिथे काम करून काही साध्य होणार नाही. आमदाराला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. कोरोनानंतर तो वरळीत जसा आमदार असावा तसा फिरताना दिसला नाही. आपल्या पक्षाने आदित्य यांना मोठ्या अपेक्षेने पाठिंबा दिल्याचे अमित ठाकरे म्हणाले.

मनसेने ज्या जागांची यादी सादर केली आहे त्यामध्ये वरळीचाही समावेश आहे. येथून मनसे संदीप देशपांडे यांना उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, अमित ठाकरे यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. राज ठाकरे यांनी मनसेची बांधणी स्वतःच्या ताकदीवर आणि मेहनतीवर केली आहे. त्यांचे मनोबल वाढले आहे. ते तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल असे आव्हानही त्यांनी ठाकरे गटाला दिले. तसेच, मुंबईत पोस्टर लावून राज ठाकरे यांनीच 21 वर्षांआधी उद्धव ठाकरे यांच्यासाठी कार्याध्यक्ष पदाचा ठराव मांडला होता याची आठवणही त्यांनी करुन दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;