शिंदे-फडणवीसांसमोरच भुजबळांचा पारा चढला, ओबीसींच्या महाबैठकीत मोठ्या घडामोडी, ‘सह्याद्री’त काय घडतंय?

शिंदे-फडणवीसांसमोरच भुजबळांचा पारा चढला, ओबीसींच्या महाबैठकीत मोठ्या घडामोडी, ‘सह्याद्री’त काय घडतंय?

महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या प्रमुख 10 नेत्यांची आज राज्य सरकारसोबत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे ही बैठक पार पडत आहे. या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा चांगलाच पारा चढला. मराठा समाजाच्या अनेक नागरिकांना खोट्या नोंदींच्या आधारावर ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप या नेत्यांनी केला. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भूमिका मांडण्यासाठी मृणाल ढोले पाटील हे देखील या बैठकीत उपस्थित होते. त्यांनीदेखील आपली भूमिका मांडली. सगेसोयरे अध्यादेश रद्द करा, अशी मोठी मागणी त्यांनी केली. तसेच दिलेल्या कुणबी नोंदींवर श्वेतपत्रिका काढा, अशीदेखील मागणी त्यांनी केली.

प्रकाश शेंडगे काय म्हणाले?

या बैठकीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे चांगलेच आक्रमक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “सगेसोयरेंचा अध्यादेश रद्द करा. ओबीसीतून आरक्षण देऊ नका. सगेसोयरेंच्या मुद्द्यावर 8 लाख हरकती आल्या आहेत. सरकारचा हरकतींवर आतापर्यंत निर्णय का आला नाही? मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस आणि खोट्या आहेत. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने तात्काळ नोंदी थांबवा. सगेसोयऱ्यांवर 27 तारखेला सुनावणी आहे. तोपर्यंत नोंदी थांबवा”, अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली.

छगन भुजबळ काय म्हणाले?

या बैठकीत छगन भुजबळ यांचादेखील चांगलाच पारा चढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “सगेसोयरेंवर आलेल्या हरकतींवर सरकारने काय केलं ते सांगा. 8 लाखांहून अधिक हरकती आल्या. त्यापुढे काय झालं? जातीचे खोटे दाखले दिले जात आहेत. त्यावर कारवाई करा. खोट्या नोंदी दाखवून खोटे दाखले दिले जात असतील तर कारवाई करा. दिशाभूल केली जात आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र दुसऱ्यांवर अन्याय नको. सरसकट दाखले दिले तर सगळे मराठा कुणबी होतील. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होईल. खोटी वंशावळ दाखवून कुणबी दाखले दिले जात आहेत”, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

हाकेंचे प्रतिनिधी काय म्हणाले?

लक्ष्मण हाके यांचे प्रतिनिधी मृणाल ढोले पाटील यांनी बैठकीत भूमिका मांडली. “सगेसोयरे अध्यादेश रद्द करा”, अशी मागणी त्यांनी केली. तसेच “दिलेल्या कुणबी नोंदींवर श्वेतपत्रिका काढा”, अशी मागणी लक्ष्मण हाकेंच्या प्रतिनिधी मृणाल ढोले पाटील यांनी केली. “ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. नोदीं या आधारकार्ड आणि पॅनकार्डशी लिंक करा”, अशी देखील मागणी मृणाल ढोले पाटील यांनी बैठकीत केली.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. त्याची स्पष्टता सरकारने करावी. दबावाखाली दाखले दिले असल्यास त्याची चौकशी करा”, असं पंकजा मुंडे या बैठकीत म्हणाल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;