मराठा, ओबीसी आरक्षण प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच फ्रंटफूट, रणनीती ठरवत आता…

मराठा, ओबीसी आरक्षण प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच फ्रंटफूट, रणनीती ठरवत आता…

मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी तीन उपोषण केले. त्यांची उपोषणाची सुरुवात अंतरवली सराटीतून झाली. पहिल्या उपोषणा दरम्यान अंतरवलीत झालेल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. त्यांचा राग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. मनोज जरांगे यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी हाताळले होते. देवेंद्र फडणवीस या प्रकरणात कधी फ्रंटफूटवर आले नाही. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस आरक्षण प्रकरणात फंटफूटवर येऊ लागले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा मोठा पराभव झाला. त्याला एक कारण मराठा आरक्षण आहे. या प्रकरणात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मराठा आरक्षण विरोधक अशी करण्यात आली. त्यामुळे आता प्रतिमा संवर्धन अन् आरक्षण आंदोलन प्रकरणात देवेंद्र फडणवीस पुढे येऊ लागले आहेत. त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाचा प्रश्न सोडवण्यास पुढकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली होती. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जात आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी पाठवले शिष्टमंडळ

एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानंतर मराठा समाज समाधानी झाला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोरऱ्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी फ्रंटफूटवर येण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांप्रमाणे ओबीसी आंदोलकांसोबत चर्चा त्यांनी सुरु केली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकारतर्फे शिष्टमंडळ शुक्रवारी पाठवण्यात आले. या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन होते.

गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे करुन दिले. त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी सरकारशी चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला. आता शिष्टमंडळ आज संध्याकाळी पाच वाजता सरकारशी चर्चा करणार आहे. एकंदरीत आरक्षण प्रश्नावर देवेंद्र फडणवीस आता फ्रंटवर आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;