रेल्वे स्‍टेशनवर पोहचली टास्‍क फोर्स, माजली खळबळ, ज्याला पकडले तो म्हणाला, आम्ही तर…

रेल्वे स्‍टेशनवर पोहचली टास्‍क फोर्स, माजली खळबळ, ज्याला पकडले तो म्हणाला, आम्ही तर…

लोकलने दररोजचा प्रवास करणाऱ्या चांगला अनुभव मिळावा त्यांना एसी लोकल आणि  फर्स्टक्लासच्या डब्यात  घुसखोरी करणाऱ्यांमुळे गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने स्वतंत्र ‘टार्स्क फोर्स’ची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सने फर्स्ट क्लास आणि एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहीमेत एक स्वतंत्र व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक 7208819987 जाहीर करण्यात आला होता.

मध्य रेल्वेने 25 मे पासून उपनगरीय गाड्यांमधील अनियमित प्रवासाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक समर्पित टास्क फोर्स सुरु केला आहे. मोबाईल क्रमांक 7208819987 या व्हॉट्सॲप हेल्पलाईनमुळे प्रवाशांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी हा 14 कर्मचाऱ्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. या मोबाईल क्रमांकावर मदतीची मागणी करता येते.

बेकायदा प्रवासाची एकूण 2,979 प्रकरणे उघड

ही योजना चालू झाल्यानंतर 15 जूनपर्यंत, बेकायदा प्रवासाची एकूण 2,979 प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्याद्वारे ज्यामुळे 10 लाख 4 हजार 985 रुपयांचा दंड आकारला आहे. या सक्रिय कारवाईमुळे प्रवाशांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. दररोज 100 हून अधिक प्रकरणांवरून दि. 15 जून 2024 पर्यंत रोज केवळ 7 प्रकरणे इतकी तक्रारींची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर दररोज 1810 लोकल फेऱ्यांद्वारे दररोज अंदाजे 33 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. मध्य रेल्वे धावणाऱ्या एकूण 66 एसी लोकलच्या फेऱ्यांमधून दररोज सरासरी अंदाजे 78,000 प्रवासी प्रवास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;