अजितदादा थोडं उशीरा आले तर, आम्हाला किमान…; शिंदे गटातील नेत्यांनी सांगितली मनातली सल

अजितदादा थोडं उशीरा आले तर, आम्हाला किमान…; शिंदे गटातील नेत्यांनी सांगितली मनातली सल

मागच्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. आधी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार भाजपसोबत गेले. त्यानंतर अजित पवार यांनीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. अशाताच अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. अजितदादा थोडे उशीरा आले असते. बरं झालं असतं. आम्हाला मंत्रिपद मिळाली असती, असं रामदास कदम म्हणालेत.

अजित पवारांबाबत काय म्हणाले?

अजितदादा थोडं उशिरा आले असते. बरं झालं असतं. आम्हाला मंत्रिपदं मिळाली असती. मी माझ्या वक्तव्याची माहिती दिलीय, असं रामदास कदम म्हणाले.

हमाम मै सब नंगे होते है… सुनिल तटकरेंची जागा कुणामुळे आली, हे त्यांना विचारा… सुनिल तटकरे यांना मी निवडून आणलेलं आहे. रायगडमधून धैर्यशील पाटीलला भाजपा लढवण्याची तयारी करत होती. तटकरेंना जागा मिळवून देण्यासाठी आम्ही काय केलं विचारा… तू तुझी लगोंट सांभाळं…, अशा शब्दात रामदास कदम यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांना सुनावलं आहे.

लोकसभा निवडणुकीवर भाष्य

भाजपच्या वरिष्ठाच्या 15 जागा सोडण्यात आल्या. 18 जागा आमच्या विजयी झालेल्या होत्या. जेवढ्या लढल्या तेवढ्या जागा मिळाल्या. भाजपचा दोन महिन्याधी डिक्लेअर झालं असतं. 13 ते 14 जागा आपल्या आल्या असत्या. नाशिकला भुजबळ बाशिंग बांधून बसले होते. आमचे सिटींग खासदार हटवल्यामुळे जागा कमी झाल्या. तीन ते चार जागा आम्हाला बदलायला लावल्या. त्यामुळे आमच्या चार ते पाच जागा गेल्या, असं रामदास कदम म्हणाले.

श्रीकांत शिंदेंची जागा देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. तुम्ही सर्व्हे केला होता. मग तुमच्या जागा गेल्या कुठे? एकनाथ शिंदेचं नुकसान झालं पर्यायानं भाजपा आणि मोदीजीचं नुकसान झालं आहे. सर्व्हेचं उत्तर भाजपला मिळालेलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;