अटल सेतू मार्गे मंत्रालय ते स्वारगेट ( Mumbai to Pune ) एसटीची इलेक्ट्रीक शिवनेरी सुसाट धावणार, पाहा आठवड्यातून किती फेऱ्या धावणार

अटल सेतू मार्गे मंत्रालय ते स्वारगेट ( Mumbai to Pune ) एसटीची इलेक्ट्रीक शिवनेरी सुसाट धावणार, पाहा आठवड्यातून किती फेऱ्या धावणार

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी ) इलेक्ट्रीक शिवनेरीचा आता शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलावरून प्रवास सुरू झाला आहे. या शॉर्टकट मार्गामुळे एसटीचा फायदा होईल असे म्हटले जात आहे. इंजिनीअरिंगचा चमत्कार मानला जाणारा शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ( अटल सागरी सेतू ) आता एसटी महामंडळासाठी फायदेशीर ठरत आहे. हा मार्ग मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेला जोडला असल्याने मुंबई ते पुणे धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या गाड्यांना मुंबईतून बाहेर पडण्यासाठी जलद मार्ग उपलब्ध झाला आहे.

एसटीच्या शिवनेरीचा मुंबई – पुणे प्रवास अटल सेतूमार्गेने होत असल्याने एसटीला चांगला फायदा होत आहे. त्यामुळे एसटीतून मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांचा फायदा होत आहे. कारण वेळेत बचत होत आहे. या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून एसटी महामंडळ फेऱ्यांमध्ये हळूहळू वाढ करीत आहे. एसटी महामंडळाने स्वारगेट मंत्रालय – स्वारगेट अशी इलेक्ट्रीक शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस धावणार आहे.

महामंडळाची एक्सवरील पोस्ट येथे पाहा –

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूने प्रवासाचे अंतर कमी होत आहे. त्यामुळे
शिवनेरीच्या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अटल  सागरी सेतूमुळे मुंबई-पुणे प्रवास 40  मिनिटांनी कमी होत असल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट शिवनेरी बस सेवेची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे, असे एसटी महामंडळाच्या अधिकऱ्याने सांगितले.

  • सोमवारी सकाळी 6 वाजता स्वारगेट – मंत्रालय
  • शुक्रवारी सायंकाळी 6.30 वा. मंत्रालय-स्वारगेट
  •  महिलांना आणि 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरात 50 टक्के सवलत तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत
  • पूर्ण तिकीट – 565 रुपये, अर्धे तिकीट – 295 रुपये

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;