Vidhan Parishad : मोठी बातमी, विधान परिषदेच्या निवडणुकीला ब्रेक? शिवसेना ठाकरे गटाचा दावा काय, सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

Vidhan Parishad : मोठी बातमी, विधान परिषदेच्या निवडणुकीला ब्रेक? शिवसेना ठाकरे गटाचा दावा काय, सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे महायुतीवर कुरघोडी करण्यासाठी नाराज आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करुन धक्कातंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच धक्का दिला आहे.

ठाकरे गट सुप्रीम कोर्टात

विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे. जर याचिका दाखल केली तर विधान परिषद निवडणूक कायदेशीर पेचात अडकू शकते.  विधानसभेच्या निवडणुकात तोंडावर असताना विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई सुरु असतानाच या नव्या मुद्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाकरे गटाचा दावा काय

आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणे आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणे हे घटनाबाह्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे

याशिवाय पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांचे प्रतिज्ञापत्र जे सर्वोच्च न्यायालयात आहेत त्यामध्ये ते शिवसेना ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदेंच्या शिवसेनेत गेलेत त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे.यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;