नड्डाजी नड्डा संभल के रखो, उद्धव ठाकरे यांची भाजप अध्यक्षांवर खोचक टीका

नड्डाजी नड्डा संभल के रखो, उद्धव ठाकरे यांची भाजप अध्यक्षांवर खोचक टीका

शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाचा ठाकरे गटाचा कार्यक्रमात षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक अंदाजामध्ये भाषण करत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर ठाकरेंनी खोचक टीका केली. नेशन वॉन्टस् टू नो, पुछता है भारत. आता पुसता है भारत. भारत त्यांना पुसून टाकत आहे. फक्त भाजपच शिल्लक राहिल असं नड्डा म्हणालेले. नड्डाजी नड्डा संभल के रखो. या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळी झाले. शिवसेना त्यांना पुरुन उरल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांच्याशी झालेली युती नैसर्गिक आहे का. मी म्हणतो भाजपमुक्त राम पाहिजे. तो मिळाला. नितीश कुमार म्हणाले होते, संघ मुक्त भारत. त्यांच्यासोबत मानाचं पान घेऊन बसले होते. मोदी चंद्राबाबूंना यूटर्न बाबू म्हणाले होते. चंद्राबाबू म्हणाले होते मोदींना अतिरेकी. मांझी म्हणाले होते राम काल्पनिक आहे. त्यांच्यासोबत हे बसले. अशा लोकांना घेऊन तुम्ही मला हिंदुत्व शिकवत आहात. माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी हिंदुत्व शिकवलं आहे. मला तुमचं हिंदुत्व मानणारं नाही. शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही. अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. तुम्ही आम्हाला शिकवण्याच्या फंदात पडू नका. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं? का तुम्ही लाचार झाला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

पदवीधर आणि शिक्षक आपण लढत आहोत- उद्धव ठाकरे

पदवीधर आणि शिक्षक आपण लढत आहोत. आपल्या मुंबईत आणि नाशिकमध्ये विजय पाहिजे. लढाई लढायची आहे. लढाई सुरू झाली आहे. 11 विधान परिषदेच्या जागांची निवडणूक सुरू झाली आहे. आमदार ते निवडून देणार आहे. कोर्टाला विनंती आहे. ही निवडणूक होईल का. अपात्रतेची टांगती तलवार असताना निवडणूक कशी होऊ शकते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असं म्हणतील ही प्रक्रिया सुरूच कशी झाली. अपात्र आमदार मतदान करूच कसे शकतात, असं ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;