छगन भुजबळ हे न सुटणारं कोडं, संशोधनाचा विषय…; मित्र पक्षातील नेत्याच्या विधानाने भुवया उंचावल्या

छगन भुजबळ हे न सुटणारं कोडं, संशोधनाचा विषय…; मित्र पक्षातील नेत्याच्या विधानाने भुवया उंचावल्या

मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे स्वपक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेवर संधी मिळावी, यासाठी छगन भुजबळ प्रयत्नशील होते. मात्र ती संधी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र माझ्या चेहऱ्यावर दिसतं का की मी नाराज आहे? अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी स्वत: दिली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे न सुटणारं कोडं आहे. त्यांची भूमिका हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणं जिकरिचं ठरेल. भुजबळांना कोणती गोष्ट कुठे टाकायचा हे माहीत आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.

संजय राऊतांवर निशाणा

संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर टीका केली होती. त्याला आता संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांच्या टिकेला अर्थ नाही. मुर्खासारखं त्याचं स्टेटमेंट आहे. शिवसेना पक्षप्रमुखाचे विचार यांनी सोडले. जे आवडतं नव्हतं ते आचरणात आणलं. आता ज्ञान पाजळत आहेत. आम्ही गोधडीत होतो. पण मग तुम्ही त्या स्टेजवर होता का?, असा प्रतिप्रश्न संजय शिरसाट यांनी केला आहे.

डोममध्ये घेतलेला कार्यक्रम पाऊस पाणी पाहून घेतलाय. तुमची सर्व कामे आम्ही करत आहोत. याच डोममध्ये तुमच्या विरोधात राहुल नार्वेकर यांनी तुमच्या विरोधात निर्णय दिला. तेव्हा हे डोम कावळे काय करत होते? संजय राऊतानेच लांडग्याचे कातडं पांघरलंय. कातडं आमच्यावर नाही तुमच्यावर आहे. कातडं पांघरून तुम्ही शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या पायाशी जाऊन बसले आहात, असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय.

व्हायरल व्हीडिओवर प्रतिक्रिया

एका कार्यकर्त्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.  नाना पटोलेंना लोकसभेनंतर अहंकार आलाय. त्यांची बाजू संजय राऊत घेत आहेत. पाय धुतल्याशिवाय उमेदवारी मिळणार नाही. म्हणून पाय धुवत आहेत. महिला नानांना माफ करणार नाहीत. मग महात्मा गांधींच्या वारसा कसा जपत आहेत? महिला वर्गात नाना पटोलेंबाबत चीड आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची ही मस्ती उतरवली जाईल, असं शिरसाटांनी म्हटलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;