Monsoon : राज्यात पावसाची प्रतिक्षा वाढली, आता या दिवशी कोसळणार

Monsoon : राज्यात पावसाची प्रतिक्षा वाढली, आता या दिवशी कोसळणार

वेळेआधी दाखल झालेला मान्सूननं आता चिंता वाढवली आहे. उकाड्याशी झुंज देणाऱ्या अनेक भागात पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. तुरळक पाऊस होत असल्याने अनेक भागात आर्द्रता वाढली आहे. अरबी समुद्रात मान्सून आणखी कमकुवत झाल्याने मान्सूनचा वेग मंदावला आहे. राजधानी मुंबईत अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे.

15 जूनच्या दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता होता. मात्र तो अद्याप दाखल झालेला नाही. मान्सून सध्या गुजरातमध्ये अडकला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील प्रणाली कमकुवत झालीये. 19-20 जून रोजी राज्यात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात सध्या फक्त मान्सूनचे क्रियाकलाप सुरू आहे. सोमवारी अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे.

मान्सून कुठे पोहोचला?

IMD ने म्हटले आहे की महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे. येत्या ५ दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये तुरळक किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या काळात जोरदार वारेही वाहू शकतात.

आज मुंबई-पुण्यासह अनेक शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात यलो अलर्ट देण्यात आलाय. मुसळधार पावसासोबत वादळी वारे वाहतील असेही हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात लवकर आगमन झाले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. कोकण, रत्नागिरी आणि मुंबईनंतर आता पावसाची वाटचाल विदर्भ आणि मराठवाड्याकडे होत आहे. असं असलं तरी गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा वेग कमी झालाय. विदर्भ-मराठवाड्यात अद्यापही सर्व जिल्ह्यांत पाऊस पोहोचलेला नाही.

20 जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल

अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे मान्सूनचा वेगही मंदावला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 20 जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. IMD ने आज राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;