Amol Kirtikar : 19 व्या फेरीनंतर मतमोजणी केंद्रात काय घडलं? अमोल किर्तीकर म्हणाले…VIDEO

Amol Kirtikar : 19 व्या फेरीनंतर मतमोजणी केंद्रात काय घडलं? अमोल किर्तीकर म्हणाले…VIDEO

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. त्यांनी अवघ्या 48 मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. या निवडणूक निकालावर ठाकरे गटाकडून वारंवार आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात येत आहे. निवडणूक निकाल देताना घोटाळा झाला असून उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर जिंकले आहेत, असा ठाकरे गटाचा दावा आहे. स्वत: अमोल किर्तीकर या निवडणूक निकालाबद्दल व्यक्त झाले आहेत. या निवडणुकीच्या निकालाला कोर्टात आव्हान देण्याात येणार आहे.

“4 जूनला त्या ठिकाणी मी उशिरा पोहोचलो. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलय, ते मिळत नाहीय. तो पर्यंत काहीही बोलू शकत नाही. 19 व्या फेरीनंतर बराचवेळ घोषणा झाली नाही. तिथली परिस्थिती तशीच होती. 19 व्या राऊंडनंतर फायलन टॅली येईपर्यत घोषणा का झाली नाही? प्रत्येक राऊंडनंतर घोषणा होते. 48 मतांनी पराजय झाला की, 48 मतांनी पराभव केलाय याच उत्तर सीसीटीव्ही फुटेजमधूनच मिळू शकतं” असं अमोल किर्तीकर म्हणाले.

‘ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल’

तुम्ही त्यावेळी लेखी आक्षेप का नाही घेतला? यावर अमोल किर्तीकर म्हणाले की, “चीफ इलेक्शन एजंट सर्वांशी व्यक्तीगत पातळीवर बोलले. पूर्नमतमोजणीची मागणी करताना लेखी आक्षेप घेतला. तो मान्य केला नाही. आरओंनी मौखिक आदेश दिले होते की नाही? ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल. काहीतरी काळबेर आहे की काय असं वाटतय” असं अमोल किर्तीकर म्हणाले. “मला ज्यांनी मतदान केलय, त्यांना आक्षेप आहे. त्यांचा संशय दूर होत नाही, तो पर्यंत, आम्ही शेवटपर्यत उभे राहू” असं अमोल किर्तीकर म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;