फ्री एण्ड फेअर निवडणूका झाल्या असत्या तर भाजपाला 40 ही जागा मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरे यांचा आरोप

 फ्री एण्ड फेअर निवडणूका झाल्या असत्या तर भाजपाला 40 ही जागा मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचा निकाल वादात सापडला आहे. या लोकसभा जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला आहे. EVM संबंधी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कालच केलेल्या आरोपानंतर या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएमबाबतचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. परंतू त्यानंतरही या मतमोजणी केंद्रात एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रतिनिधीकडे असलेल्या मोबाईल फोनवरुन गुन्हा दाखल झालेला आहे, त्यातच आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या मुंबई उत्तर पश्चिम निकालावरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाप्रमाणे देशातील इतरही मतदारसंघात निवडणूक यंत्रणेचा गैरवापर केलेला आहे. तर खरोखरच निवडणूक पारदर्शक झाली असती तर भाजपाला देशात 40 जागाही मिळाल्या नसत्या असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदार संघात झालेल्या गडबडीवरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला आहे. यावेळी शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी आरोप केला आहे की निवडणूकीच्या मतमोजणीत19 फेरीनंतर जसा जसा निकालाचे आकडे जवळ जवळ येत होते तशी तशी पारदर्शकता बंद झाली. आधी प्रत्येक फेरीनंतर मतदानाचे आकडे आरओ अनाऊन्समेंट करुन सांगत होते. 19 फेरीनंतर ही प्रक्रिया बंद झाली. त्यानंतर थेट 22 व्या फेरीलाच आकडे सांगितल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

650 मतांचा फरक

सहा मतदार संघ असले तर एआरओच्या टेबल जवळ एक लोकप्रतिनिधींचा प्रतिनिधी असतो. एक राऊंड झाल्यानंतर त्यांच्या समोर 14 टेबलची टॅली करुन हे आकडे सांगितले जातात. नंतर आरओला आकडे दिले जातात. परंतू यावेळी आमच्या प्रतिनिधीत आणि एआरओ यांच्यात प्रचंड अंतर होते. मोठी जाळी होती. ते काय करत आहेत हे कळत नव्हते असेही अनिल परब म्हणाले. उमेदवाराला 17 c फॉर्म दिला जातो. हा प्रत्येक ईव्हीएम मतपेटीत किती मते असतात ? ती मोजल्यानंतर ती किती आहेत ती दाखवून सही घेतली जाते. केंद्राध्यक्षाची सही करुन या 17 c फॉर्म प्रमाणे मते मतपेटीत मोजली का याची टॅली आपल्याला नंतर करुन खातर जमा करता येते. त्यानंतर फॉर्म 17 c part 2 हा देखील देण्याची तरदूत असते. यावेळी हा फॉर्म 17 c part 2 मागणी करुन ही दिला नाही. या फॉर्मद्वारे आमची मते आणि त्यांची मोजलेली मते याची टॅली होते. आमच्या आणि त्यांच्या मतात आमच्या मोजणीनूसार 650 मतांचा फरक आलेला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
22 ते 23 फेरीनंतर एकदम मते जाहीर केल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;