मुंबई, पुण्यात बारमध्ये दारु पिण्यासाठी आता हा पुरावा लागणार

मुंबई, पुण्यात बारमध्ये दारु पिण्यासाठी आता हा पुरावा लागणार

मद्यप्रेमींसाठी शासनाने आता नियम तयार केले आहे. शासनाप्रमाणे आता पब अन् बार मालकांनी पुढाकार घेतला आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकारानंतर आता बार अन् पबमध्ये मद्य पिण्यासाठी बदल करण्यात आले आहे. पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत भरधाव कार चालवत दोघांना उडवले होते. त्यानंतर या प्रकरणात अनेक बाजू समोर आल्या. पोलीस अन् प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु माध्यमे अन् जनतेच्या रेट्यामुळे या प्रकरणात नऊ पेक्षा जास्त लोकांना अटक झाली होती. या प्रकरणात पोलीस अन प्रशासनावर सडकून टीका झाली. त्यामुळे खळबळून जागे झालेल्या पब अन् बार चालकांनी आता आपलीच कठोर नियमावली तयार केली आहे. यामुळे मुंबई अन् पुण्यात मद्य अन् वाईन पितांना वयाचा पुरावा लागणार आहे.

काय आहे नियम

पुणे, मुंबई, नागपूरसारख्या मोठ्या शहरात मद्याच्या नशेत अल्पवयीन मुलांकडून वाहने भरधाव वेगाने चालवण्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. त्यामुळे आता मुंबई पुण्यात बार अन् पबमध्ये दारु पिण्यापूर्वी वयाचा पुरावा तपासला जाणार आहे. सरकारी ओळखपत्रातील वय त्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. अल्पवयीन मुलांना बार अन् पबमध्ये प्रवेश मिळू नये, यासाठी प्रवेश द्वारावरच ओळखपत्र तपासले जाणार आहेत. वाईन अन् बियर पिण्यासाठी २१ वर्ष वय तर दारू पिण्यासाठी २५ वर्ष वय बंधनकारक असणार आहे. अनेक पब चालकांनी ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारू न देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे पोर्श अपघात विशाल अग्रवालच्या अडचणी वाढल्या

पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये विशालवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस विशाल अग्रवाल याला कधी ही अटक केली जाऊ शकते. बावधन येथील ज्ञानसी ब्रम्हा सोसायटीने हा गुन्हा दाखल केला आहे.

2010 साली पजेशन देऊन ही विशाल याने पुढची पूर्तता केलेली नाही. सोसायटीत ठरलेल्या सुविधा, मोकळी जागा, कंव्हीन्स डिड लेटर अद्याप दिले नाही. तसेच आवारातील रिकन्स्ट्रक्शनसाठी सोसायटीसाठी परवानगी घेतली नाही. याप्रकरणी सोसायटी आणि विशाल अग्रवालचे वाद सुरू होते. पोर्श प्रकरणात त्याचे कारनामेसमोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी हा ही गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या विशाल अग्रवाल याला या प्रकरणात कधी ही अटक केली जाऊ शकते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;