अमेरिकेतून एलन मस्कचा ईव्हीएमवर आरोप, भारतात निवडणूक आयोग आक्रमक, सरळ मस्कला दिले आव्हान

अमेरिकेतून एलन मस्कचा ईव्हीएमवर आरोप, भारतात निवडणूक आयोग आक्रमक, सरळ मस्कला दिले आव्हान

EVM Hacking Elon Musk : टेस्लाचा सीईओ एलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (EVM) मशीन हॅक होऊ शकते, असे विधान अमेरिकेत केले. त्याचे पडसाद भारतात उमटले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्राथमिक फेरीतील निवडणुकीसंदर्भात माहिती मस्क यांनी सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर भारतातील विरोधक आक्रमक झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्यावरुन राजकारण पेटवले. एलन मस्कच्या या वक्तव्याच्या भारतीय निवडणूक आयोगाने चांगला समाचार घेतला आहे. आयोगाने सरळ एलन मस्कला आव्हान दिले आहे.

हा मुर्खपणाचा अंदाज- निवडणूक आयोग

मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते, असा अंदाज वर्तवल्यानंतर निवडणूक आयोग आक्रमक झाला आहे. हा मुर्खपणाचा अंदाज आहे. एलन मस्क यांच्याकडून भारतातील निवडणुकांची विश्वासार्हता बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप एलन मस्कवर निवडणूक आयोगाने केला. आयोगाने भारतातील ईव्हीएमचे कस्टम डिझाईन, सुरक्षितता यावरुन मस्कला आव्हान दिले आहे.

भारतात या, ईव्हीएम हॅक करुन दाखवा

निवडणूक आयोगाने एलन मस्कला म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला भारतात येण्याचे आव्हान देतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीत वापरल्या गेलेल्या ईव्हीएम हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखवा, असे खडे बोल ईव्हीएम हॅक प्रकरणावर निवडणूक आयोगाने एलन मस्क याला सुनावले. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांनी एलन मस्कला ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. मस्क याच्या विधानात काहीच तथ्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मस्कच्या ट्विटनंतर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

एलन मस्क यांनी ईव्हीएमसंदर्भात ट्विट करताच काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले. त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. लोकसभा निवडणूक 2024 चे निकालात भाजपला बहुमत मिळाले नाही. 400 पारचा नारा देणारी भाजप बहुमतापासून दूर राहिला. यामुळे या निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा आला नव्हता. परंत आता एलन मस्कच्या दाव्यानंतर पुन्हा या मुद्यावर चर्चा होऊ लागली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;