वंदेभारत स्लिपर कोचबाबत आली आनंदाची बातमी, गाडी या तारखेला रुळांवर येणार

वंदेभारत स्लिपर कोचबाबत आली आनंदाची बातमी, गाडी या तारखेला रुळांवर येणार

वंदेभारत ही देशाची पहीली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनला पूर्वी ट्रेन-18 म्हटले जायचे. नंतर तिचे नामकरण वंदेभारत एक्सप्रेस ( Vande Bharat Express )  असे करण्यात आले. वंदेभारत ही इंजिन लेस ट्रेन आहे. त्यामुळे तिला लांबपल्ल्यांच्या इतर गाड्याप्रमाणे डिझेल किंवा वीजेवरील इंजिन लावण्याची काही गरज नसते. सध्या देशभरात 100 वंदेभारत ट्रेन सुरु आहेत. त्यातील काही ट्रेन 16 डब्यांच्या तर काही ठिकाणी प्रवासी कमी असल्याने 8 डब्यांच्या ट्रेन चालविण्यात येत आहेत. पहिली वंदेभारत नवी दिल्ली ते वाराणसी अशी चालविण्यात आली होती. पहिली वंदेभारत ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु झाली होती. आतापर्यंत या ट्रेनच्या स्लीपर व्हर्जन आल्या नव्हत्या. त्यामुळे आता लवकरच वंदेभारत स्लीपर कोचची सुरुवात होणार आहे.

बहुप्रतिक्षित वंदेभारत ट्रेनचा स्लीपर कोच ( Vande Bharat Express sleeper coach ) ऑगस्ट महिन्यात चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरीतून ( आयसीएफ ) बाहेर पडणार आहे. या स्लीपर कोचची ट्रायल घेतली जाणार आहे. सहा महिन्यानंतर ही स्लिपर कोच वंदेभारत प्रत्यक्ष रुळावर येणार आहे. साल 2029 पर्यंत 300 हून अधिक वंदेभारत स्लीपर आणि चेअरकार ट्रेन देशभर सुरु करण्यात येतील. तर सर्वसामान्य जनतेसाठी 400 नॉन एसी अमृतभारत ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. वंदेभारत स्लिपर कोच पहिल्या टप्प्यात 130 किमी वेगाने चालविण्यात येणार आहेत.

इतक्यांची डब्यांची स्लीपर ट्रेन

भारतीय  रेल्वेच्या  रुळांची क्षमता वाढविल्यानंतर वंदेभारत स्लिपर कोच ट्रेन प्रति तास 160 ते 220 किलोमीटर वेगाने चालविण्यात येतील त्यामुळे प्रवाशांना आरामात झोपून दिल्ली गाठता येणार आहे. देशातील पहिली वंदेभारत sleeper coach डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात दिल्ली ते कोलकाता किंवा दिल्ली ते मुंबई या पैकी एका मार्गावर धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंदे भारत स्लिपर कोचमध्ये 16 डबेच असणार आहेत. यात दहा डबे एसी-3, आणि चार डबे एसी-2 आणि एक डबा एसी- 1 चा असणार आहे. तर दोन डबे एसएलआर असतील.

वंदेभारत स्लीपरचे भाडे ?

वंदेभारत स्लीपर कोच आवृत्तीचे भाडे अद्याप निश्चित झालेले नाही. या गाडीचा वेग, सोयी सुविधा आणि सुरक्षा पाहाता या ट्रेनचे भाडे राजधानी एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेसच्या भाड्याच्या 10 ते 15 टक्के अधिक असण्याची शक्यता आहे. या स्लीपर वंदेभारत राजधानी आणि शताब्दीच्या जागी चालविण्याची योजना आहे. मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस सध्या स्वतंत्र इंजिन लावून चालविण्यात येतात, त्यामुळे प्रवाशांना धक्के बसतात. तसेच त्यांच्या वेगावर देखील मर्यादा येते. वंदेभारतना स्वतंत्र इंजिन लावण्याची गरज नाही. त्यामुळे या गाड्यांचा वेग वाढविता येणार असून ही ट्रेन गंतव्याच्या ठिकाणी तीन तास आधीच पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास तेरा ते चौदा तासातच संपणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;