ELON MUSK नंतर राहुल गांधी यांचे EVM संदर्भात ट्वीट, वायकर यांचा संदर्भ देऊन म्हणाले, EVM हा एक ब्लॅक बॉक्स…

ELON MUSK नंतर राहुल गांधी यांचे EVM संदर्भात ट्वीट, वायकर यांचा संदर्भ देऊन म्हणाले, EVM हा एक ब्लॅक बॉक्स…

एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भातले आरोप होत असतानाच टेसला मोटर्स आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात एक पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे. त्यातच आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील EVM संदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या एका नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या बातमीचा हवाला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे.

टेस्ला आणि एक्सचे मालक ELON MUSK यांनी अमेरिकेतील निवडणूकीचा संदर्भ घेत एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी EVM हे विश्वासार्ह नाही. त्याला हॅक करता येऊ शकते असे म्हटले आहे. त्यामुळे EVM ऐवजी अनेक राष्ट्र जुन्या पद्धतीचे बॅलेट मतदानाला प्राधान्य देत आहेत अशी पोस्ट इलॉन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर केली आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या आरोप होणाऱ्या बातम्यांचे कात्रण कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोस्ट केले आहे. आणि ELOM MUSK यांची पोस्ट देखील टॅग केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर वाईकरांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. भारतातील ईव्हीएम हा एक “ब्लॅक बॉक्स” आहे आणि कोणालाही त्यांची तपासणी करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा लोकशाही संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही फक्त दिखावा म्हणून उरते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते अशा आशयाची पोस्ट कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर केली आहे.

राहुल गांधी यांची पोस्ट –

एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भातले आरोप होत असतानाच टेस्ला इलेक्ट्रीक कार आणि एक्सचे मालक एलोन मस्क यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात एक पोस्ट करीत चिंता व्यक्त केली आहे. इलॉन मस्क यांनी म्हटलंय, ‘ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजेत. कारण मानवी हस्तक्षेपाने किंवा इतर प्रकारे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे’ इलॉन मस्क यांच्या या ‘एक्स’ पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील घटनेचा दाखला दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रवींद्र वायकर यांचा 46 मतांनी विजय

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीला महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर हे सुरुवातीला मतमोजणीत पिछाडीवर होते. त्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना अडीच हजार मतांनी विजयी करण्यात आले. त्यानंतर रवींद्र वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. त्यानंतर अखेर समसमान मते झाली, त्यानंतर पोस्टल बॅलेट मतमोजणीत 46 मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषीत करण्यात आले. या मतदान केंद्रात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकांनी मोबाईल फोन वापरल्याचा आरोप ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. या फोनमुळे ईव्हीएम मशिन अनलॉक केल्याचे म्हटले जात आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;