महायुतीत आम्हीच मोठे भाऊ, शिंदे गटाच्या दोन नेत्यांचं मोठं विधान; भाजपला इशारा?

महायुतीत आम्हीच मोठे भाऊ, शिंदे गटाच्या दोन नेत्यांचं मोठं विधान; भाजपला इशारा?

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मोठा भाऊ छोटा भाऊवरून महाविकास आघाडीतील वाद थांबलेला असतानाच आता या वादाने महायुतीत डोकं वर काढलं आहे. महायुतीतील शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि शंभुराज देसाई यांनी आम्हीच महायुतीत मोठा भाऊ असल्याचं विधान केलं आहे. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यामुळे आम्हीच मोठा भाऊ आहे, असं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील दोन्ही नेत्यांनी ही विधाने केल्याने महायुतीत जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे गटाकडून एक प्रकारे हा भाजपला इशारा असल्याचंही सांगितलं जात आहे.

संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. टक्केवारीवर राजकारण मांडलं जात नाही. ठाकरेंनी लढवलेल्या जागा 22 आहेत. शिवसेनेच्या लढवलेल्या जागा 15 आहेत. त्याच्याशी तुलना कशी करणार? त्या तुलनेत आमचा जो स्ट्राईक रेट आहे, तो 46 टक्क्यांवर आहे. म्हणून आमच्या जागा त्या तुलनेत जास्त आहे. महायुतीत आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याने आम्हीच मोठा भाऊ आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले.

ते पालखीचे भोई

काँग्रेसची ताकद आणि निवडून आलेले खासदार या बेसवर त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलंय. ज्यांनी त्यांची पालखी वाहिली होती, त्यांच्या पालखीचे जे खांदेकरी होते. त्यांनी पालखी घेऊन पुढे जावी. 288 मतदारसंघ ते लढवतील. त्यांचा विजय होवो किंवा पराभव होवो, हे लोक पालखीचे भोईच आहेत, असा टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

राऊतांमुळे पक्षाची वाट लागेल

तुम्ही काय कमावलं आणि गमावलं? हे चित्र रोखलं नाही तर भविष्यात तुम्हाला पालखी वाहण्यापासून रोखणार नाही. म्हणून आताही वेळ गेलेली नाही. ठाकरे गटाने पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे काय नुकसान याचं चिंतन मनन केलं पाहिजे. संजय राऊत म्हणेल तसा पक्ष चालत असेल तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय.

मैत्रीतील वाद की खरं भांडण?

अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. दानवे आणि सत्तार यांची मैत्री चांगली आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद होतात. त्या गोष्टी सीरिअस घेण्याची गरज नाही. त्यांच्यातील भांडण हे मैत्रीतील आहे की खरंखुरं भांडण आहे, हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले.

नाराजीवर निर्णय घ्यावा

छगन भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. भुजबळ कोणत्या गोष्टीवर नाराज आहेत हे अजित पवार यांनी पाहावं. त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा. अनेक ज्येष्ठ लोकांना टाळलं जातं. अनेकांना न्याय मिळत नाही. मंत्रिमंडळ विस्तार वेगळा अन् भुजबळ यांची नाराजी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

देसाई ही तेच म्हणाले

शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनीही संजय शिरसाट यांची री ओढली आहे. महायुतीत आम्हीच मोठे भाऊ आहोत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;