अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला… अयोध्येतील भाजपच्या पराभवावर उद्धव ठाकरे यांचा टोला

अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला… अयोध्येतील भाजपच्या पराभवावर उद्धव ठाकरे यांचा टोला

लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात चांगलाच फटका बसला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराची केलेली प्राणप्रतिष्ठा भाजपला उत्तर प्रदेशात यश मिळवून देऊ शकली नाही. अगदी अयोध्या ज्या मतदार संघात येते त्या फैजाबाद लोकसभा मतदार संघातही भाजपचा पराभव झाला. त्यावरुन शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच घेरले. शनिवारी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला, असा खोचक टोला लगावला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीने शनिवारी राज्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नाशिकमध्ये २२ जानेवारी रोजी सभा घेतली होती. त्या दिवशी मी काळाराम मंदिरात भगवान रामाचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे. मग हा भाजपमुक्त राम अयोध्यावासियांनी करुन दाखवला. त्या ठिकाणी भाजपला यश मिळाले नाही.

मोदींचे पद कसेबसे वाचले

नरेंद्र मोदी यांना समजायला पाहिजे होते की, संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिले होते. परंतु त्यांना ते समजले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेने धडा दिला. आता कसेबसे त्यांचे पंतप्रधानपद वाचले आहे. आता त्यांचे सरकार किती दिवस राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते खोटे आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. त्यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आमच्यासोबत येणाऱ्यांचे स्वागत

काही लोक आमच्यासोबत होते. त्यांना घेऊन पुढे जाऊ. कुणी जर आमच्यासोबत येत असतील. कोणतीही अट आणि ओढताण न करता येत असतील तर त्यांनी यावे. मी हे सर्वांसंदर्भात बोलत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हे ही वाचा

लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक अधिक ताकदीने लढणार… महाविकास आघाडीने विधानसभेचे रणशिंग फुंकले

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;