धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला, पण त्याला… पृथ्वीराज चव्हाण यांनी टोचले भाजपचे कान

धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला, पण त्याला… पृथ्वीराज चव्हाण यांनी टोचले भाजपचे कान

राज्यातील शेतकऱ्यांनीही सरकारला संदेश पाठवला आहे. कोणत्याही समाजाला गृहित धरू नका. चौकशी करणाऱ्या संस्थांनाही तोंड द्यावं लागलं. पूर्वी झालं नाही एवढं या काळात धार्मिक ध्रुवीकरण केलं गेलं. त्याला काही यश मिळालं नाही, असं म्हणत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे कान टोचले आहेत.

महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी  पत्रकार परिषद आयोजित केली आहे. लोकशाही वाचवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केलं. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आघाडीला निर्णायक बहुमत दिलं आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. यात ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केलं. पक्ष आणि संघटनांची यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा भाजपव निशाणा

जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपली आहे. आम्ही निकालाची अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयात काय झालं हे जगाने पाहिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपला किती मतं मिळाली आणि किती लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं ही टक्केवारी बाहेर आली पाहिजे. मुंबई लुटली जात असेल तर मराठी माणूस त्यांना मतदान करणार नाही. अजुनही भाजपला वास्तवाची जाणीव आली नसेल तर निवडणुकांच्या निकालाच्या विस्तवांना सामोरं जावं लागेल, असंही ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;