अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? शरद पवार एका वाक्यात म्हणाले…

अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? शरद पवार एका वाक्यात म्हणाले…

महायुतीमध्ये गेलेल्या अजित पवार यांची घुसमट होत असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक जागा अजित पवार यांची आली होत. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका बसल्याचंही बोललं जातं. राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचा दरारा होता तो कुठंतरी कमी झाल्यासारखं वाटतं. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? असा सवाल केला गेला. यावर शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

शरद पवार काय म्हणाले?

साधी गोष्ट आहे. आमच्या लोकांच्या हातात सत्ता नाही. सत्ता कुणाच्या हातात आहे हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. काही निर्णय घेतले असेल तर आनंद आहे. साधी गोष्ट आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होता. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर अजितदादांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? असं विचारल्यावर त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला. आम्ही का सांगावं, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहेत. पण आम्ही बोलू इच्छित नाही, एवढच त्यांना सांगायचं आहे. जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं. जुन्या काळातील. ते काढून आता बदनामी केली जाते. ती सत्तेचा गैरवापर आहे. काही लोकांनी बाबतीत यापूर्वी केसेस केल्या होत्या. त्यातील काही लोकांना जामीन दिला. काही लोक कारण नसताना आरोपात गेले. आजही तुरुंगात गेले, याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे. या सत्तेच्या गैरवापरातून लोकांनी भूमिका घेतली. ते शहाणपणा घेतील असं वाटलं होतं. पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील, असंही शरद पवार म्हणाले.

मविआमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ नाही- चव्हाण

मोठा भाऊ छोटा भाऊ नाही. आम्ही एकत्र चर्चा केली आहे. प्राथमिक चर्चा झाली आहे. मागच्या विधानसभेचा आधार घेऊन जागा वाटप होईल. आमच्या कोणताही किंतू परंतु नाही, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;