‘तुमचं रक्ताचं नातं ना, बाळासाहेबांकडे तुमची मागणी काय होती, सांगा लोकांना’; छगन भुजबळांचा ठाकरेंना सवाल
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचं दाखला देत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अजुनही टीका केली जाते. छगन भुजबळ यांची टीव्ही९ मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी मुलाखतीत घेतली. यामध्ये काय घडलं होतं हे सर्व सविस्तर सांगत भुजबळांनी राज ठाकरेंना सवाल केला आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली त्यावेळी त्यांनी काय मागण्या केल्या होत्या? हे समोर येऊन सांगावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल
माझ्याबद्दल बोलता मग राज ठाकरे लहान असताना शाळेत असताना राज ठाकरे लवकर आले नाहीत तर मासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे जेवत नव्हते. रक्ताचं नाते आहे, तुमचे मतभेद कशावरून झाले, झाले तरी तेव्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती. तुमचे मतभेद काय होते, तुमची मागणी काय होती, सांगा लोकांना, मतभेद असले तरी सांभाळून घ्यायला नको का, राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केल्याचं भुजबळ म्हणाले.
बाळासाहेबांनी काहीतरी सांगितलं असतं की तु हे नाही तर हे काम कर, ज्याला मी लहानपणापासून सांभाळत आलो, ज्याच्यासाठी मी जेवण करत नव्हतो त्याने असं करावं. बाळासाहेब ठाकरेंच्या मनाला काय वाटलं असेल, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा मी दोघांनाही फोन केला आणि बोललो की पाच ते सहा दिवस एकमेकांना काही बोलू नका. राग हा त्या क्षणापुरता असतो, राग शांत झाला की मन बदलतं. दोघांनीही ऐकलं पण मतभेत झाले आणि राड ठाकरेंनी आपला निर्णय घेतल्याचं भुजबळ यांनी सागितलं.
बाळासाहेबांना मातोश्री हेच तुरूंग समजून तिथे ठेवा- भुजबळ
मी त्यावेळी विरोधी पक्षामध्ये होतो तेव्हा मी बाळासाहेबांवर टीका केली त्यांनी माझ्यावर केली. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा सभेत आम्ही सर्वांनी श्रीकृष्ण कमिशनचा जो अहवाल आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करू. माझ्यासमोर प्रश्न होता की जेव्हा पोलिसांनी माझ्यावर फाईल ठेवली तेव्हा मी नाही कसं बोलणार, दंगे आणि बॉम्बस्फोट झालेले त्यासंदर्भातील केस होत्या. त्यावेळी तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर यांना सांगितलं होतं की, बाळासाहेबांना कस्टडीमध्ये ठेवायचं नाही. जामीन मिळत असेल तर देऊन टाका. हे शक्य नाहीच झालं तर बाळासाहेबांना मातोश्री हेच तुरूंग समजून तिथे ठेवा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List