Mercedes Benz : रोजगाराच्या आघाडीवर शुभवार्ता; मर्सिडीज महाराष्ट्रात 3 हजारांची गुंतवणूक करणार, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारची जोरात तयारी

Mercedes Benz : रोजगाराच्या आघाडीवर शुभवार्ता; मर्सिडीज महाराष्ट्रात 3 हजारांची गुंतवणूक करणार, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारची जोरात तयारी

रोजगाराच्या आघाडीवर मोठी सुवार्ता आली आहे. वाहन निर्मिती करणारी जगविख्यात कंपनी बर्सडिजी बेंज महाराष्ट्रात 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात येत असल्याच्या विरोधकांच्या आरोपानंतर ही उद्योगविश्वासाठीची मोठी घडामोड मानण्यात येत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उद्य सामंत यांनी जर्मनीमधील स्टुटगार्ट येथील बेंझच्या प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. त्यावेळी कंपनीने राज्यात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठी तयारी चालविल्याचे दिसून येत आहे.

उद्योगांना प्रोत्साहन

गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने देशभरात औद्योगिक धोरणात अमुलाग्र बदल केला आहे. अजूनही बदलाचे वारे वाहतच आहे. भारतीय स्टार्टअप्स, युनिकॉर्न कंपन्यांनी मोठी भरारी घेतली आहे. नवतरुण नवनवीन उद्योग उभारत आहेत. तर अनेक जागतिक ब्रँडने भारताकडे आगेकूच सुरु केली आहे. चीनमधील प्रकल्प गुंडाळून काही कंपन्यांनी भारतावर लक्ष केंद्रीत केले आहे. मोबाईल, तंत्रज्ञान, वाहन निर्मिती आणि इतर क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना भारतीय बाजार खुणवत आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. पण औद्योगिक आघाडीवर वादाचे फड रंगले होते. राज्यातील काही उद्योग गुजरातला पळविण्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. त्यासाठी अनेक पुरावे पण सादर करण्यात आले होते. त्यामुळे महायुतीची मोठी कोंडी झाली होती. नवीन उद्योग राज्यात येऊ दिल्या जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

उद्योगमंत्र्यांनी ट्वीट करुन दिली माहिती

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी याविषयीची माहिती दिली. जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडीज बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. बेंझ यंदा राज्यात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे राज्यात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होईल. यासंदर्भात चर्चा झाली आहे. यावेळी मर्सिडीज बेंझ कंपनीचे संचालक सदस्यांशी त्यांनी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी गुंतवणूक

महायुतीला लोकसभेत राज्यातील जनतेने मोठा हिसका दाखवला. महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला. या गुंतवणुकीमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला मजबुती मिळेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातसह इतर राज्यांत गेल्याच्या आरोपांना हे एक प्रकारचे उत्तर मानण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;