राज ठाकरेच मनसेचे सर्वेसर्वा, अध्यक्षपदी निवड; कधीपर्यंत अध्यक्षपदी राहणार?

राज ठाकरेच मनसेचे सर्वेसर्वा, अध्यक्षपदी निवड; कधीपर्यंत अध्यक्षपदी राहणार?

मनसे पक्षाच्या अध्यक्षपदी राज ठाकरेंची निवड करण्यात आली आहे. मनसेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये एकमताने राज ठाकरेंची निवड झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार राज ठाकरेंची निवड झालीये. राज ठाकरे मनसे पक्षाचे 2023 पासून 2028 पर्यंत अध्यक्ष असणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत माहिती दिली. राज ठाकरे यांची नेमणूक करावी असा ठराव बाळा नांदगावकर यांनी मांडला. तर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिले. या ठरावामध्ये एकमताने राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरे यांची निवड झाली आहे.

राज ठाकरे बैठकीत काय म्हणाले?

मविआला झालेलं मतदान मोदी विरोधातून झालेलं आहे. मविआच्या प्रेमातून झालेलं नाही. शिवसेना ठाकरे गटाला मराठी माणासाने अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं नाही. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतल्याचं लोकांना पटलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतल्या राजकारणात बाळासाहेबांना आणू नका, असं अमित शहांना सांगितलं. बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे. हे देखील अमित शहांना सांगितलं. आपण विधानसभेच्या २०० ते २२५ जागा लढवत आहोत, असं राज ठाकरे बैठकीत म्हणाले.

मनसे स्वबळावर

आमचं कोणासोबतही बोलणं सुरू नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत. पुढे काय होतं ते माहित नाही पण आम्ही आमची तयारी करत असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीनमध्ये मनसे पक्षाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे, ठाण्यात नरेश म्हस्केंसाठी सभा घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्षाला यश मिळालं नाही. मनसे पक्षाची फक्त एक जागा निवडून आली होती. कल्याण ग्रामीणमधू राजू पाटील विजयी झाले होते. यंदा राज ठाकरेंच्या पक्षाच्या  किती जागा येतात? त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;