Sanjay Raut : मोहन भागवत तरी कुठे मणिपूरला गेले; संजय राऊत यांचं थेट सरसंघचालकांना आव्हान काय?

Sanjay Raut : मोहन भागवत तरी कुठे मणिपूरला गेले; संजय राऊत यांचं थेट सरसंघचालकांना आव्हान काय?

मणिपूर गेल्या वर्षभरापासून धुमसत असताना सत्ताधारी त्यावर मूग गिळून गप्प असल्याचा घणाघात इंडिया आघाडीतील नेत्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने भाजपवर तिखट हल्लाबोल केला. निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरमधील हिंसेवरुन मोदी सरकारचे कान टोचले. त्यांच्या वक्तव्यानंतर काल उद्धव ठाकरे आणि आज संजय राऊत यांनी भाजपासह सरसंघचालकांना पण चिमटे काढले.

भाजपने संघाला संपवलं

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर चौफेर टीका केली. आरएसएसचं म्हणणं भाजपवाले ऐकतात का. खासकरून मोदी शाह आरएसएसचं ऐकतात का. आरएसएस एकेकाळी भाजपची मातृसंस्था होती. संघाने भाजपला वाढवलं. एक नैतिक ताकद दिली. पण गेल्या दहा वर्षात भाजपच्या बड्या नेत्यांनी पहिलं काम कोणतं केलं तर ते म्हणजे संघाला संपवण्याचं, असा आरोप त्यांनी केला.

मोहन भागवतांवर साधला निशाणा

संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्यावर पण निशाणा साधला. मोहन भागवत तरी कुठे गेले मणिपूरला. मोहन भागवत गेले का काश्मीरला. आम्हाला त्यांच्याकडून आशा आहे. मोदी शाह जात नसतील तर तुम्ही जा. तुमच्यासोबत आम्ही येतो. देशाच्या सुरक्षेचं प्रकरण आहे. तुम्ही नेतृत्व करा. आम्ही येतो. केवळ गप्पा मारून काय होतं, असा टोला पण त्यांनी लगावला.

राऊतांनी संघाचा घेतला खरपूस समाचार

लोकसेवकाला अहंकार असता कामा नये असं मोहन भागवत म्हणत होते. पण अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी आणि शाहने मोडल्या आहेत. संघालाही त्याचा फटका बसला आहे.आता तुम्हा काय करणार आहे. तुमच्यात बंड करण्याची हिंमत आहे काय, असेल तर भाजपमध्ये तुमचे लोक जे बसले आहेत. शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी आहेत. ते मोदी आणि शाह यांच्या विरोधात बंड करतील का. ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला, मणिपूरमध्ये जे घडलं त्याबद्दल आवाज उठवणार आहात का. केवळ गप्पा मारून काय होणार आहे. लिहून काय होणार आहे. आम्हीही लिहित असतो. पण आम्ही कारवाईही करतो. संघाला देशाच्या हितासाठीही भूमिका घ्यावी लागेल. संघाचे लोक भाजपमध्ये बसले आहेत. त्यांना गप्प बसून चालणार नाही देशात दोन हुकूमशाहा देशातील भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहे. संघाने ते आवरायला हवं, असे राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;