Mumbai News : महिलेने खाल्ले अर्ध्यांहून अधिक आईसक्रीम, कोनमध्ये आढळले असे काही की तिची फुटली किंकाळी, पोलिस आले घटनास्थळी

Mumbai News : महिलेने खाल्ले अर्ध्यांहून अधिक आईसक्रीम, कोनमध्ये आढळले असे काही की तिची फुटली किंकाळी, पोलिस आले घटनास्थळी

आईसक्रीम हा तर अनेकांचा वीक पाईंट. अनेकांना तर पावसाळा, हिवाळ्यात पण आईसक्रीमशिवाय जमत नाही. पण आईसक्रीम खाताना तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. मुंबईतील मालाडमध्ये प्रकरणच तसे समोर आले आहे की तुम्ही आईसक्रीम कोन खाताना दहादा विचार कराल. कारण पण तसेच धक्कादायक आहे. कारण या आईसक्रममध्ये जे आढळले, त्यामुळे तुम्हाला किळस आल्याशिवाय राहणार नाही.  अर्ध्याहून अधिक आईसक्रीम खाल्ल्यानंतर या महिलेने जे पाहिले, त्यामुळे ती किंचाळली. आता याप्रकरणात पोलीस तपास करत आहेत.

काय सापडले आईसक्रीममध्ये

मुंबईतील मालाड भागात एका महिलेने ऑनलाइन आईस्क्रीम ऑर्डर केली होती. महिलेला आईस्क्रीमच्या शंकूमध्ये मानवी विच्छेदन केलेले बोट सापडले. याबाबत महिलेने पोलिसांना माहिती दिली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांचे म्हणणे आहे की आइस्क्रीम कोनमध्ये मानवी शरीराचे अवयव आहेत.

अधिक पुष्टीकरणासाठी पोलिसांनी आइस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग एफएसएलकडे पाठवला आहे.महिलेने अर्ध्याहून अधिक आईस्क्रीम खाल्ले होते, मात्र काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच तिने त्या आईस्क्रीममध्ये एक मानवी बोट तोडलेले दिसले. सध्या मालाड पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.

एमबीबीएस डॉक्टरला धक्का

पेशाने डॉक्टर असलेल्या महिलेने बुधवारी सकाळी आईसक्रीमची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. डिलिव्हरी ॲपवर ही ऑर्डर देण्यात आली होती. काही वेळानंतर आईसक्रीम आली. त्यातील वरचा भाग खाल्ल्यानंतर आतमध्ये कोणती तरी कडक वस्तू असल्याचे तिला जाणवले. तिने ती बाहेर खेचली. तेव्हा ते 2 सेमीचा बोटाचा तुकडा असल्याचे लक्षात आले. लागलीच तिने ही माहिती पोलिसांना दिली.

या घटनेने पोलीस पण चक्रावले. आईसक्रीमधून निघालेला मानवीय तुकडा त्यांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पुढील तपासासाठी पाठवला आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच ते खरंच मानवी बोट होतं की दुसरे काही हे समोर येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने तपासाला गती येईल. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आता पोलीस प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;