दोन आगींच्या घटनानंतर डोंबिवली एमआयडीसी कंपनी स्थलांतर बाबत मोठी बातमी, त्या कंपन्यांचे आता…

दोन आगींच्या घटनानंतर डोंबिवली एमआयडीसी कंपनी स्थलांतर बाबत मोठी बातमी,  त्या कंपन्यांचे आता…

डोंबिवली येथील एमआयडीसीमध्ये महिन्याभरात दोन आगीच्या घटना घडल्या. महिन्याभरापूर्वी डोंबिवलीमधील अंबर केमिकल कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 72 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. त्यानंतर मालदे आणि इंडो अमाईन्स या कंपन्यांनाही 12 जून रोज आग लागली. त्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले आहे. स्थानिक लोकांनी केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली आहे. डोबिंवलीमधील घातक कंपन्यांसंदर्भात एक कृती आरखडा तयार करण्यासाठी समिती तयार केली आहे. ही समिती अहवाल देणार आहे. त्यानंतर कंपन्यांचे स्थालंतर करण्याबाबत विचार करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

कृती आराखडा समितीला अहवाल २० जूनपर्यंत

अमूदान कंपनी स्फोटानंतर डोंबिवली एमआयडीसीमधील अतिधोकादायक आणि धोकादायक कंपन्या हटविण्याचा एक कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने समितीने नेमली होती. त्याबरोबर कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याकरीता एक उपसमिती नेमली होती. या उपसमितीने सर्वेक्षण करुन येत्या २० जूनपर्यंत कृती आराखडा समितीला अहवाल सादर करायचा आहे. त्यानंतर कृती आराखडा समिती कंपन्या स्थलांतरीत करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.

अशी आहे समिती

डोंबिवली एमआयडीसीतील फेज-२ मधील इंडो अमाईन कंपनीला भीषण आग लागली. त्यात जिवीत हानी झाली. या आगीच्या पार्श्वभूमीवर सरकारने २७ मे रोजीच एमआयडीसी, पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी संबंधित विभागांची बैठक घेत कृती समिती स्थापन केली होती. हा निर्णय उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतला होता. कृती आराखडा तयार करण्याकरीता सरकारने उपसमितीही स्थापन केली. त्यामध्येही पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, अग्नीशमन दल, महापालिका यांचा समावेश होता.

ही माहिती समिती घेणार

डोंबिवलीतील अतिधोकादायक, धोकादायक आणि अन्य कंपन्या स्थलांतरीत करण्याकरीता पावले उचलता येतील याचा अहवाल तयार करण्याचे काम दिले गेले आहे. समितीच्या आत्तापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहे. उपसमितीने सर्वेक्षण केल आहे. या सर्वेक्षणानुसार कंपनी कोणाच्या मालकीची आहे. त्यात कोणते उत्पादन घेतले जाते. त्यासाठी कोणत्या रासायनिक कच्चा मालाचा वापर केला जातो. कंपनीची जागा किती आहे. कंपनी स्थलांतरीत करण्यास मालकाची सहमती आहे की नाही.त्याचा एकत्रित अहवाल येत्या २० जूनपर्यंत कृती आराखडा समितीला दिला जाईल. त्यानंतर कृती आराखडा समिती कंपन्या स्थलांतरीत करण्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड यांही दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;