राज ठाकरेंनी वाढवले भाजपचे टेन्शन, सेनेच्या जागांवर मनसेचा डोळा, पुतण्या विरोधात देणार हा शिलेदार?

राज ठाकरेंनी वाढवले भाजपचे टेन्शन, सेनेच्या जागांवर मनसेचा डोळा, पुतण्या विरोधात देणार हा शिलेदार?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. राज ठाकरे यांनी भाजपच्या समर्थनार्थ राज्यात सहा सभा घेतल्या होत्या. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सहाच्या सहा जागा निवडून आल्या. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर करून एकच खळबळ माजवली. त्या धक्क्यातून भाजप सावरत नाही तोच आता मनसेनेही भाजपचे टेन्शन वाढवले आहे. मनसेने आगामी विधानसभेसाठी 20 जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक जागांवर शिवसेनेचे ( शिंदे आणि ठाकरे गट) आमदार निवडून आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधान सभेच्या 288 जागांपैकी 20 जागांची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा उमेदवारांची यादीही मनसेने तयार केली आहे. मनसेने भाजपकडे वरळी, दादर-माहीम, शिवडी, मागाठाणे, जागेश्वर, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, दिंडोशी, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, पंढरपूर, औरंगाबाद आणि पुण्यातील एका जागा मागितली आहे.

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे आमदार आहेत. ही जागा मनसेने भाजपकडे मागितली आहे. येथून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर, वरळी शेजारील आणि राज ठाकरे यांचे वास्तव्य असणाऱ्या दादर – माहीम मतदारसंघाचीही मागणी मनसेने केली आहे. येथे शिंदे गटाचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. येथून माजी आमदार नितीन सरदेसाई यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याशिवाय शालिनी ठाकरे यांना वर्सोव्यातून तर माणसे नेते बाला नांदगावकर यांना शिवडी विधानसभेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या. मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. भाजपच्या जागा 23 वरून 9 वर आल्या आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडीअंतर्गत काँग्रेसला 13, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. तर सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. एनडीए आघाडीच्या जागा कमी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. राज्यभरातील मनसे कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर येणार आहेत. तर, भाजप प्रदेशने याच दिवशी मुंबईमध्ये जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;