तुम्ही सत्तेसाठी पवारसाहेबांच्या मागे होता, पण…; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर थेट निशाणा

तुम्ही सत्तेसाठी पवारसाहेबांच्या मागे होता, पण…; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर थेट निशाणा

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. सकाळी- सकाळी तुम्ही जायचा ना शरद पवारसाहेबांकडे आणि म्हणायचा की चला भाजपबरोबर जाऊ… पण शरद पवारसाहेब कधीच जातीयवादी पक्षासोबत जायचे नव्हते. तुम्ही सत्तेसाठी पवारसाहेबांच्या मागे होता. पण शरद पवारसाहेब तुम्हाला आशेचा किरण दाखवत राहिले. त्यामुळे तुम्ही चिकटून राहिलात. त्यानंतर तुम्हीच गेलात. पण पवारसाहेब आलेच नाहीत, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

तटकरेंना सवाल

सुनील तटकरेंनी माझे नाव नाही घेतलं. साहेबांनी तुम्हाला तारखा दिल्या. कारण तुम्हीच मागे लागला होतात. चला भाजपसोबत जाऊ या… चला बीजेपीत जाऊया.. 2009 ला तुम्ही फॅार्म्युला दिला. 2014 ला सुद्धा तुम्हीच मागे लागलात. तटकरे तुम्ही इतके आतल्या गाठींचे कसे? सगळ ठरवेल तुम्ही सगळे केलं तुम्ही.. मी सत्य सांगितले. तुम्हीच मागे लागला होता. पवारसाहेब नेहमी म्हणतात की लोकशाहीत चर्चा व्हायला पाहिजे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी तटकरेंवर निशाणा साधला आहे.

अजित पवारांवर हल्लाबोल

तुम्ही विचारधारा सोडली. त्यामुळे आरआरएस काय म्हटलं की तुम्ही ओझे झाला आहात. तुम्ही प्रफुल्लभाईंना सांगता मी सकाळी सकाळी सांगितले की तुम्ही त्यांना द्या तुम्ही स्पर्धेत नाहीत. तुम्ही छगन भुजबळ यांना सांगता की तुम्ही राज्यभर फिरा. म्हणजे राज्यसभा विसरा… तुमच्या मुलांबाळात किती संघर्ष चालू आहेत हे आम्हाला माहिती आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला आहे.

तुम्ही मला आयुष्यभर टार्गेट केलं. जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील, असं तुम्ही म्हणत होतात. तुम्ही सकाळी सकाळी गेलात ना.. शरद पवारसाहेब जो घेतील तो निर्णय आमचा असेल. तेव्हा अजितदादांच्या मागून खोटे बोले नका… गद्दारीचा नेरेटिव्ह खोटारडेपणाचा नरेटिव्ह तुम्ही सेट केला. आधी तुम्हीच छगन भुजबळ साहेबांना यांना घरी का बसवलंत. तुम्ही त्यांना का सांगता राज्यात फिरा, असं आव्हाडांनी म्हटलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;