‘नीट’ परीक्षा खाजगी क्लासेस घेणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेलीय का? अमित ठाकरे आक्रमक

‘नीट’ परीक्षा खाजगी क्लासेस घेणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेलीय का? अमित ठाकरे आक्रमक

देशभरात नीटपरीक्षेच्या निकालावरून वाद होत असल्याचं दिसत आहे. परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याने परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली याची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केलीये. अशातच मनसे अध्य राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनीही यावरून टीका केली आहे.

हरियाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? 67 मुलांना पैकीच्या पैकी गुण? हे काय चालले आहे? ‘नीट’ ही परीक्षा आता खाजगी क्लासेस आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेली आहे का? परीक्षेत गडबड, विद्यार्थी-पालकांमध्ये अविश्वास, डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यात तीव्र संताप, आंदोलने. हे चित्र निश्चितच दुर्दैवी आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलने सुरू आहेत, हे बरे नव्हे, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

पेपरफुटीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास अजूनही यंत्रणा अपयशी का? पारदर्शकतेचा अभाव दिसून येतोय. ‘नीट’ परीक्षा केवळ डॉक्टर बनण्याचा मार्ग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा आधार आहे. या परीक्षेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट:-

पेपर फुटीचा नेमका वाद काय?

देशभरात झालेल्या नीट परीक्षेसाठी 23 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. या पराक्षेचा 4 जूनला निकाल लागला आणि या परीक्षेमध्ये एकूण 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क पडले. इतकंच नाहीतर या 67 मधील सहा विद्यार्थी हे हरियाणामधील एकाच सेंटरमध्ये परीक्षेला बसले होते. परीक्षेत मायनस मार्किंग सिस्टिम असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे पडले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;