भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीत महाराष्ट्राच्या निवडणुकीचा खोडा? मग कोण असेल शिलेदार? पक्षापुढे हा आहे पर्याय

भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीत महाराष्ट्राच्या निवडणुकीचा खोडा? मग कोण असेल शिलेदार? पक्षापुढे हा आहे पर्याय

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे अजून काही दिवस पदावर विराजमान असू शकतात. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत एक पर्याय समोर येत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष न बदलण्याचा प्रस्ताव भाजपसमोर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील निकालाने भाजपला मोठा धक्का दिला. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही मोठी परीक्षा असेल. त्यामुळे नवीन अध्यक्षांच्या निवडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत अजून एक पर्याय समोर येत आहे.

नियम सांगतो काय?

नरेंद्र मोदी सरकारमध्ये जेपी नड्डा यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडावे लागणार हे निश्चित मानण्यात येत आहे. भाजपच्या घटनेनुसार, एक व्यक्ती केवले एका पदावर असू शकतो. त्यामुळे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर जेपी नड्डा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडावे लागू शकते.

सप्टेंबरपर्यंत भाजपचे अध्यक्ष

पण भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशी संबंधित सूत्रांनी या प्रकरणात नवीन ट्विस्ट आणला आहे. त्यांच्यानुसार, पक्ष कार्यकारी अध्यक्षाची नियुक्ती करु शकतो. तोपर्यंत जेपी नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. कार्यकारी अध्यक्षाविषयी अजून निर्णय झालेला नाही. तोपर्यंत नड्डा हेच मंत्रायासह पक्षाचे पण काम पाहतील.

तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण

जे. पी. नड्डा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पूर्ण केला होता. त्यानंतर त्यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नड्डा यांना मोदी सरकारमध्ये आरोग्य मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांच्याकडे हेच काते होते. त्यांना पुन्हा कॅबिनेटची संधी देण्यात आल्यानंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे.

नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वात निवडणूक

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डिसेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात येऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वात या निवडणुका लढविल्या जाऊ शकतात. अर्थात याविषयीची निश्चित माहिती अद्याप हाती आलेली नाही.

अनुराग ठाकूर यांचे नाव आघाडीवर

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्पर्धेत इतर अनेक नावे मागे पडली आहे. या निवडणुकीत अनुराग ठाकूर यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण खात्याचा पदभार होता. युवक आणि क्रीडा खात्याची जबाबदारी पण त्यांच्या खांद्यावर होती. त्यांना मोदी सरकारच्या नवीन कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्याने अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;