हेलिकॉप्टरने जाऊन शेती का करतात?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं नेमकं कारण….
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी त्यांना शेतीची आवड आहे. साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी ते वारंवार जातात. लोकसभा निवडणूक संपल्यानंतरही एकनाथ शिंदे गावी गेले होते. शेतात जात त्यांनी पाहणी केली होती. मात्र एकनाथ शिंदे हे हेलकॉप्टरने जात शेती करतात, अशी टीका विरोधक करत असतात. याला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. मी गावी जातो, शेती करतो. मात्र लोक म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात… मी मुख्यमंत्री असल्याने माझा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. शेती करण्यासाठी गावी गाडीने गेलो. तर दहा तास लागतील. एवढ्या वेळात मी 1000 फाईल साइन करतो. त्यामुळे मी कोणाकडे लक्ष देत नाही मी माझं काम करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्राला बांबूची गरज 2022 ला बांबू लावलेले… जेव्हा गरज पडली तर बांबू लावा लागतं. ही मस्करी यासाठी सुरू आहे. आमदार गोवाटीला आमच्या सोबत होते. त्यावेळेला भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळेला आम्ही बांबू लावले. नसता तर आज आमची बैठकी या ठिकाणी होत नसती, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List