भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाविषयी मोठी अपडेट; RSS मुख्यालयात मोठी खलबतं

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाविषयी मोठी अपडेट; RSS मुख्यालयात मोठी खलबतं

भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाविषयी अजून एक घडामोड समोर येत आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अर्थात ही घडमोड नवी दिल्लीत नाही तर नागपूरमध्ये घडत आहे. नागपुरमधील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयातून हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयात ठरणार आहे. भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसवर सोडल्याची चर्चा आहे.

जे.पी. नड्डा यांची केंद्रात वर्णी

केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते राज्य पातळीपर्यंत आता मोठे बदल दिसतील. जे.पी. नड्डा यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे लवकरच पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. नड्डांचा कार्यकाळा हा 6 जून रोजी संपला.भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. देशभरातून अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात राज्यातील या नेत्याचे नाव पण आघाडीवर असल्याचे समजते.

या नावांची चर्चा

राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राज्यातील नेते विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. त्यांच्यासोबत चर्चेत असणाऱ्या भाजपच्या अनेक नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तावडे यांच्या नावा व्यतिरिक्त ओम माथूर, सुनील बन्सल यांची नावे चर्चेत आहेत.

मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, सी. आर. पाटील ही नावे पण चर्चेत होती. या नेत्यांपैकी एकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल असे वाटत होते. ही सर्व नावे शर्यतीत होती. पण मोदींनी पुन्हा धक्कातंत्र वापरले. या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने ही नावे मागे पडली आहेत .

अध्यक्ष बदलला जातो अथवा मिळते मुदत वाढ 

भाजपातंर्गत दर तीन वर्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष बदलला जातो किंवा अध्यक्षांना पुन्हा संधी दिली जाते. अध्यक्षाला मुदत वाढ देण्यात येते, असे दरेकर म्हणाले. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी जून महिन्यात संपला होता. त्यावेळी त्यांना एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली होती. भाजप पक्ष घटनेनुसार, अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येते. सध्याच्या घडामोडी पाहता, नागपूर येथून नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;