सर्वात मोठी बातमी : विधानसभेला मविआ एकत्र लढणार की स्वतंत्र?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण

सर्वात मोठी बातमी : विधानसभेला मविआ एकत्र लढणार की स्वतंत्र?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण

लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यानंतर आता महाराष्ट्रात आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना हे तीन पक्ष या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार की स्वतंत्रपणे लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय. संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. विधानसभेला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

मविआ एकत्र लढणार?

येत्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष एकत्र निवडणूक लढणार की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. तेव्हा विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवू. त्यासाठी स्थानिक स्तरावर संघटन मजबूत असणं गरजेचं आहे. त्याचबाबत आजच्या बैठकीत आम्ही चर्चा केली. एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू. पण तिथं संघटनात्मक बांधणी मजबूत झाली पाहिजे. त्यासाठी कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. 180-185 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

ठाकरे गटाच्या बैठकीत काय चर्चा?

भाजपला बहुमतापासून रोखण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाविकास आघाडीचा मोठा वाटा आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, मुंबईचे विभाग प्रमुख यांची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यास सांगण्यात आलं आहे. तशी चर्चा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली, असं संजय राऊत म्हणाले.

भाजप रोखण्यात महावीकास आघाडीचे योगदान जास्त आहे. संघटनात्मक बांधणीवर आम्ही जोर दिला आहे. स्थानिक मतदारसंघातील निवडणुका आहेत त्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. 288 मतदारसंघाची बांधणी करण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. आम्ही महिविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहोत. उद्धव ठाकरेंच्या विधानसभेच्या पुर्वतयारीसाठी ईनडोर सभांचं आयोजन करण्यात आलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;