मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून खुली, 40 मिनिटांचे हे अंतर अवघ्या 9 मिनिटांत फत्ते

मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून खुली, 40 मिनिटांचे हे अंतर अवघ्या 9 मिनिटांत फत्ते

मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या ( कोस्टल रोड ) दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आले आहे. मंगळवारपासून( 11 जून 2024 ) हा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी खुला होत आहे. या मार्गामुळे मरिन ड्राईव्ह ते हाजीअली हा टप्पा अवघ्या काही मिनिटांत पार पाडता येणार आहे. या कोस्टल रोडवर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 16 तास प्रवास करता येणार आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता ( दक्षिण ) अंतर्गत दुसऱ्या बोगद्याचे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पाहणीनंतर उद्घाटन करण्यात आले आहे.

कोस्टल रोड विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचाही विस्तार लवकरच

मुंबईकरांना वाहतूकीच्या कोंडीपासून हा नवा टप्पा दिलासा देणार आहे. वरळीकडे जाणार मार्ग आज खुला करण्यात आला आहे. 6.5 किमी अंतराचा हा मार्ग आहे पुढील तिसरा टप्पा 10 जुलै रोजी सुरू करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. आधी या मार्गावर 40 ते 50 मिनिटे लागत होती आता 9 मिनिटांत हा टप्पा पार करता येणार आहे. अत्यावशक सर्व यंत्रणा या भूमिगत मार्गात उभारण्यात आल्या आहेत. लवकरच हा रस्ता वरळी सी लिंकला जोडला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच होईल अशी मिश्कील टीप्णणी केली. यावेळी त्यांना राज ठाकरे बद्दलच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.

हा फायदा होणार

बहुचर्चित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्हपासून सुरू होणारा उत्तर दिशेने जाण्यासाठीचा दुसरा भूमिगत बोगदा आज दुपारपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे दहा मिनिटं पुरेशी असणार आहेत, त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे. यामुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव, याचबरोबर पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगद्यातून होणाऱ्या वाहतुकीमुळे वेग येणार आहे .

येथे पहा व्हिडीओ –

शनिवारी – रविवारी बंद

एकूण आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये सकाळी 07 ते संध्याकाळी 11 म्हणजे एकूण 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असणार आहे. आणि आठवड्याचे उर्वरित दोन दिवस प्रकल्पाच्या मेंटेनन्सचे काम केले जाणार असल्याने शनिवार आणि रविवार हा मार्ग बंद असणार आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मार्गिकेची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या साथीने याच बोगद्यातून विंटेज कारमधून प्रवास करीत पाहणी केली आहे. ही विण्टेड कार कोस्टल रोड बोगद्यातून नेण्यात आली, त्याद्वारे या बोगद्याची पाहणी करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;