शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा सर्वात मोठा दावा… तर दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा सर्वात मोठा दावा… तर दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार

राज्यातील राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना तर दुसरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेते रोज एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करत असतात. परंतु जुन्या शिवसैनिकांकडून अजूनही दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे, असा सूर निघत असतो. मध्यंतरी मुंबईत दोन्ही शिवसेने एकत्र यावे, असे बनर्स लागले होते. आता यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट

शिवसेनेची खरी दौलत म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. परंतु काही लोकांची निष्ठा बदलली आहे. त्यांना आता शिवसेना प्रमुखांपेक्षा शरद पवार, राहुल गांधी दौलत वाटत आहेत. त्यांच्या आणि आमच्या विचारसरणीमध्ये खूप फरक आहे. त्याचा आम्हाला त्रास होतो. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. आताही त्यांनी त्यांची दिशी बदलली तर दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

अनिल पाटील यांना टोला…

आम्ही उठाव वेगळ्या भावनेतून केला आहे. शिवसेना प्रमुखांचा विचार? ही आमची भूमिका आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते, ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेसाठी ८० जागांची मागणी केली आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, अनिल पाटील यांनी ८० नव्हे तर १०० जागा मागव्या, १५० जागा मागव्या पण पक्षाच्या बैठकीत मागव्यात. चॅनलवर बोलून त्यांना जागा मिळणार नाही.

श्रीरंग बारणे यांची नाराजी

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभातील चोवीस तास उलटले नाहीत, तोवर एनडीए गटातील खदखद चव्हाट्यावर समोर आली आहे. शिवसेनेला केंद्रीय राज्यमंत्रीपद दिल्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त आहे. यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवे होते. एनडीएमधील काही पक्षांचे एक-एक खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेटमंत्रीपद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असा आरोप खासदार बारणे यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;