Modi Cabinet 3.0: कधी पंक्चर काढले, गाड्यांची रिपेरिंग केली, अजूनही जुन्या स्कूटरवर फिरतात, आता मोदी 3.0 मध्ये मंत्री

Modi Cabinet 3.0: कधी पंक्चर काढले, गाड्यांची रिपेरिंग केली, अजूनही जुन्या स्कूटरवर फिरतात, आता मोदी 3.0 मध्ये मंत्री

Modi Cabinet 3.0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील 72 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात सर्वच घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात मध्य प्रदेशातील टिकमगड येथील खासदार वीरेंद्र कुमाकर खटीक यांचाही समावेश आहे. वीरेंद्र कुमार त्यांच्या साध्या, सरळ जीवनचार्यामुळे ओळखले जातात. 2017 मध्ये ते मोदी कॅबिनेटमध्ये महिला आणि बाल विकास राज्यमंत्री झाले. त्यानंतर 2021 मध्ये सामाजिक न्यायमंत्री त्यांना बनवण्यात आले.

स्कूटरमुळे असतात बातम्यांमध्ये

सागर जिल्ह्यातील अतीसामान्य परिवारात 27 फेब्रुवारी 1954 रोजी वीरेंद्र कुमार खटीक यांचा जन्म झाला. परंतु मेहनतीने त्यांनी सागर विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. शिक्षण करत असताना वीरेंद्र कुमार यांनी गाड्यांचे पंक्चर काढण्याचे काम केले. गाड्यांची रिपेरिंग त्यांनी केले. दिग्गज नेता अजूनही आपल्या जुन्या स्कुटरवर सर्वसामान्य लोकांमध्ये जातात. यामुळे 1996 मध्ये लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा यश मिळवल्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंकज अहिरवार यांना 4 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले.

बालपणापासून संघाच्या शाखेत

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाखाप्रमुख
  • 1975 मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या संपूर्ण क्रांती चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
  • आणीबाणी लागू केल्याच्या निषेधार्थ सागर आणि जबलपूर यांना अंतर्गत सुरक्षा कायदा (MISA) अंतर्गत 16 महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आले.
  • विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी चळवळ सुरू केली आणि त्यांच्या मदतीसाठी वाचनालय सुरू केले
  • 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
  • दलित नेते वीरेंद्र कुमार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील टिकमगड मतदारसंघ 8व्यांदा विजय मिळवला.
  • मागील मंत्रालयात, ते सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात कॅबिनेट मंत्री होते. मोदी मंत्रिमंडळात त्यांनी महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.
  • कुमार खटीक यांनी डॉक्टर हरिसिंह गौर विद्यापीठ सागर येथून अर्थशास्त्रात एम. ए. केले. त्यानंतर बाल श्रम हा विषय घेऊन पीएचडी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;