मान्सून स्थिरावला, मुंबई, कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा, राज्यात कुठे, कसा पडणार पाऊस?

मान्सून स्थिरावला, मुंबई, कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा, राज्यात कुठे, कसा पडणार पाऊस?

राज्यातील अनेक भागांत आता मान्सूनचे आगमन झाले आहे. पुणे, मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. पावसाची सुरुवातच जोरदार झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी १० जून रोजी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई , पालघरला यलो अलर्ट तर ठाणे पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

मुंबईत मुसळधार कोसळला

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. नालासोपाऱ्यात महापालिकेच्या विजेच्या खांब्याला शॉक लागून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा पूर्व येथील महेश पार्क तुलिंज रोडमध्ये मध्यरात्री ही घटना घडली आहे. रोहन कासकर (वय 29 वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते. या पाण्यातून मार्ग काढत जात असताना ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पावसाळापूर्वी महापालिकेने केलेल्या कामाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

मुंबईत सकाळपासून पाऊस पडत आहे. रविवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री देखील रिमझिम पावसाच्या सरी बरल्या. दादरमधील हिंदमाता परिसरात पावसामुळे पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे काही गाड्या देखील बंद पडल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस

नाशिकमध्ये देखील जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. नाशिक शहरासह परिसरात रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील वडाळा परिसरात भिंत कोसळून चार ते पाच जखमी झाले आहेत. नाशिकच्या मनमाड शहर परिसरात मेघ गर्जनेसह पावसाने धुंवाधार बॅटिंग केली. सुमारे तासभर सुरु असलेल्या मुसळधार पावासाने शहराट सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावासामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा व पांझन नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. पाऊस पडल्याने खरीप हंगामाच्या पेरणी कामाला सुरवात होणार असल्याने बळीराजा सुखवाला आहे.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे तिसगाव सहपरिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जेच्या कडकडाट सहवादळी पावसाने उमराणे सहपरिसरातील कांद्याची २५ हून अधिक शेड जमीनदोस्त केलीत. निवाऱ्यासाठी थांबलेल्या एकाचा शेड कोसळल्याने त्याखाली दबल्याने मृत्यू झाला तर तिसगाव येथे एकाचा वीस पडून मृत्यू झाला. उमराणे तिसगाव सह परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक विजेचे खांब कोसळले तसेच रस्त्याच्या कडेला असलेले झाड उन्हाळून पडले. अचानक झालेल्या या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर चांगला पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;