Monsoon : यंदा मरीन ड्राईव्हवर पावसाची मजा घ्यायला जाण्याचा प्लान करताय तर सावधान…

Monsoon : यंदा मरीन ड्राईव्हवर पावसाची मजा घ्यायला जाण्याचा प्लान करताय तर सावधान…

यावेळी मान्सूनची जरा जास्तच वाट पाहीली जात आहे. दरवर्षी आपल्याला यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक होता असं जरी वाटत असलं, तरी यंदा खरोखरच तापमानाने उच्चांक गाठलेला आहे. मुंबईसह राज्यभरात आणि देशभरात यंदा उष्णतेची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारात उष्णतेमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पर्जन्यराजाची जरा जास्तच वाट पाहीली जात आहे. त्यात हवामान खात्याने गोड बातमी दिली आहे. की यंदाचा मान्सून सरासरी पेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातील समुद्राच्या लाटांची मजा घेण्याचा प्लान तुम्ही एव्हाना आखला असेलच… तर सावधान यंदा मुंबईत समुद्राला चांगलंच उधाण येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात 22 दिवस उधाणाचे असणार असून त्या दिवशी 5 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे पालिकेने कंबर कसली आहे.

येत्या 24 तासात केरळात अतिमुसळधार पाऊस येण्याचा अंदाज आहे. याच्यानंतर पुढच्या आठवडाभरात मान्सून आपली वर्दी कोकण आणि मुंबईत देणार आहे. मुंबईतील अनेक चौपाट्यांवरील बंदोबस्तात वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. यंदा मान्सूनमध्ये पावसाळ्यात 22 दिवस उधाणाचे असणार आहेत. त्यावेळी 4.5 ते 5 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे पालिकेने खास उपाय योजना केलेल्या आहेत. मुंबईतील मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस, जुहू-वर्सोवा, वांद्रे बॅण्ड स्टँड येथे पावसाच्या लाटांची मजा घेण्यासाठी मोठी गर्दी उसळत असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिकेने यंत्रणा सज्ज केली आहे. लाटांची उंची जास्त असलेल्या दिवशी खास खबरदारी बाळगण्याच्या सूचना पालिक प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिलेल्या आहेत.

समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सूचना

यावर्षी पावसाळ्यात समुद्राला तब्बल 22 दिवस प्रचंड मोठे उधाण येणार असून समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात 4.5 ते 5 मीटरपर्यंत उत्तुंग लाटा उसळणार आहेत. मुंबईतील चौपाट्यांवर पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक-मुंबईकर गर्दी करतात. मात्र काही अति उत्साही पर्यटकांमुळे त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याच्या दिवशी पालिकेकडून धोक्याचा इशारा दिला जातो. शिवाय सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होते. तसेच अतिवृष्टीप्रसंगी समुद्राला भरती असल्याने पाणी इमारती तसेच झोपडपट्ट्यांमधी शिरण्याचे प्रकार घडत असल्याने धोक्याची स्थिती निर्माण होत असते. या पाश्र्वभूमीवर चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेने 94 लाईफ गार्डस् तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या लाईफ गार्डकडे बचावकार्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

JUNE AND JULY HIGH TIDE DATE

22 day high tide

20 सप्टेंबरला सर्वात मोठी लाट

जूनमध्ये सात दिवस 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धडकतील. जुलैमध्ये असे चार दिवस असतील, ऑगस्टमध्ये पाच दिवस आणि सप्टेंबरमध्ये सहा दिवस मोठ्या लाटा उसळतील, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 1:03 वाजता 4.84 मीटरपर्यंत पोहोचणारी सर्वोच्च लाट उसळेल असा अंदाज आहे. त्या खालोखाल बुधवार 21 ऑगस्ट रोजी दु.12.57 वा. 4.81 मीटर, गुरुवार 6 जून रोजी 4.69 मीटर, बुधवार 24 जुलै रोजी 4.72 मीटर उंचीच्या लाटा उसळतील अशी माहीती पालिकेने दिल आहे.

AUGUST AND SEP 2024 HIGH TIDE DATE

AUGUST AND SEP 2024 HIGH TIDE DATE

94 लाईफ गार्डीची तैनाती

लाईफ गार्डला बॅकअप देण्यासाठी फायर ब्रिगेडच्या फ्लड रिस्पॉन्स टीम गवालिया टँक फायर स्टेशन, वांद्रे फायर स्टेशन, कुर्ला फायर स्टेशन, मालाड फायर स्टेशन, दहिसर फायर स्टेशन आणि गोराई फायर स्टेशनवर सज्ज ठेवण्यात येणार आहेत. या टीमची घटनास्थळी मदत घेतली जाणार आहे. सहा चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दलाकडून ‘दृष्टी लाईफ सेव्हींग’चे 94 लाईफ गार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या देखरेखीखाली हे लाईफ गार्ड आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. समुद्र किनाऱ्यांवर काही दुर्घटना घडू नये आणि कोणी पाण्यात वाहून गेल्यास त्यांच्या बचावासाठी सकाळी 7 ते रात्री 19 वाजेपर्यंत दोन शिफ्टमध्ये लाईफ गार्ड तैनात ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;