बच्चा बडा हो गया ! सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर रोहित पवारांचे ट्विट, अजित पवारांवर साधला निशाणा

बच्चा बडा हो गया ! सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर रोहित पवारांचे ट्विट, अजित पवारांवर साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. बारामतीमध्ये पुन्हा लेकीने बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे यांचा भरघोस मतांनी विजय झाला असून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर , सुप्रिया सुळे यांच्या विजयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवारांवर टीका केली आहे. त्यांचं हे ट्विट सध्या भलतंच चर्चेत आहे.

बच्चा बडा हो गया !

रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय!

बारामतीत सुप्रियाताईंचा #विजय ✌हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, #मविआ चे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे.

या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन! असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

रोहित पवार अजून बच्चा आहे, असं म्हणत अजित पवारांनी त्यांना हिणवलं होतं. त्याच टीकेला अप्रत्यक्षपणे उत्तर देताना रोहित पवार यांनी हे ट्विट करत टोला लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;