Maharashtra Political News live : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ, राष्ट्रपती भवनातील सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.या शपथविधी समारंभापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सकाळी राजघाटावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी वॉर मेमोरियलवर जाऊन शहिदांना अभिवादन केले. मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा देखील आज शपथविधी होणार असून जगभरातील विविध राष्ट्रांचे प्रमुख या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 1400 रुपयांनी घसरले तर चांदीच्या भावातही 600 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर 71 हजार 500 रुपये प्रतितोळ्यावर आले तर चांदी 92 हजार 200 रुपये प्रतिकिलोवर आली. जळगावच्या सराफ बाजारात दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण सुरू आहे. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे शहरात विविध भागात पाणी साचलं असून पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात अजूनही पाणी साचलेलं आहे. भुयारी मार्गात असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे दुकानातील सामानाचे नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये आज भारत वि. पाकिस्तान सामना रंगणार असून सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्यावर लागले आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List