सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं, बॅनरद्वारे राष्ट्रवादीने अजित पवारांना डिवचलं

सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं, बॅनरद्वारे राष्ट्रवादीने अजित पवारांना डिवचलं

लोकसभा निवडणूकीच्या अवघे काही महिने आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवार तसेच अजित पवार यांचे दोन गट पडले. अजित पवार यांनी सत्तेची कास धरली, त्यांनी पक्ष आणि पक्ष चिन्हावरही ताबा मिळवला. या निवडणुकीत अजित पवार यांनी महायुतीसोबत निवडणूक लढवली. तर काँग्रेस, शिवसेनेसोबत शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली. बारामतीमध्ये तर सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाल्यामुळे पवार वि. पवार असा सामना रंगला होता. त्यामुळे शरद पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.

मात्र बारामतीसह राज्यातील १० पैकी 8 जागांवर जागांवर विजय मिळवला. तर अजित पवार यांच्या पक्षाला अवघी १ जागा जिंकता आली. या निकालानंतर कोल्हापूरमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवारगटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापूरी शैलीत पवारांची स्तुती करत अजित पवार आणि विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे. बॅनरबाजीतून अजित पवार यांना चांगलाच चिमटाही काढण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला चांगल्याच मिरच्या झोंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

काय आहे बॅनर ?

कोल्हापूरमधील दाभोळकर चौक परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेला हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं..’ ही अवघी एक ओळ या बॅनरवर आहे, पण त्यातचा निशाणा बरोब्बर लागला आहे. याच बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेली तुतारी हा फोटोही असून या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरच्या दाभोळकर चौक परिसरात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. “सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं…”, असा एका ओळीचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. शरद पवारांचा फोटो आणि एका बाजूला पक्षाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्हही आहे. रात्री हे बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या बॅनरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. या एका ओळीतून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत काय केलं? याची प्रचिती येत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;